गणेश देशमुख यांनी  स्वीकारला पनवेलच्या आयुक्तपदाचा पदभार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 04:13 PM2018-04-18T16:13:11+5:302018-04-18T16:13:11+5:30

पनवेल महानगर पालिकेचे नननिर्वाचित आयुक्त गणेश देशमुख यांनी दि.१८ रोजी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.मात्र मावळते आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे मात्र यावेली अनुपस्थित होते.

Ganesh Deshmukh Take the charge of Commissioner of Panvel | गणेश देशमुख यांनी  स्वीकारला पनवेलच्या आयुक्तपदाचा पदभार 

गणेश देशमुख यांनी  स्वीकारला पनवेलच्या आयुक्तपदाचा पदभार 

googlenewsNext

पनवेल - पनवेल महानगर पालिकेचे नननिर्वाचित आयुक्त गणेश देशमुख यांनी दि.१८ रोजी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.मात्र मावळते आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे मात्र यावेली अनुपस्थित होते. गणेश देशमुख हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त झालेले अ श्रेणीचे नगरविकास विभागाचे अधिकारी आहेत . नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या आयुक्तपदावरून बदली होवून त्यांना पनवेल महानगर पालिकेचे आयुक्तपद देण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वी कल्याण डोंबिवली , व कोल्हापूरच्या, मिरा भाईदर  उपायुक्तपदी काम केले आहे . कोल्हापूर महानगर पालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारी हि त्यांनी चोखपणे पार पाडली आहे .नांदेड शहराचा घनकचरा व्यवस्थापन , व स्वच्छतेच्या बाबतीत महत्वाचे काम केले आहे . त्यांच्या या कामाबाबत राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष सत्कार केले आहे .

Web Title: Ganesh Deshmukh Take the charge of Commissioner of Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.