घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, November 08, 2017 2:24am

घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची घटना खारघर येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची घटना खारघर येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळ येथे राहणा-या खाजामोईनुद्दीन मुथलीफ (६१) यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यांना चौदा लाखांत घर मिळवून देतो असे एका परिचयाच्या व्यक्तीने सांगितले होते. यानुसार मुथलीफ यांनी सदर व्यक्तीला धनादेशाद्वारे १२ लाख रुपये दिले होते, परंतु रक्कम घेवूनही त्यांना घर मिळत नव्हते. यामुळे त्यांनी सदर व्यक्तीकडे घरासाठी पाठपुरावा केला असता, त्याने सुरवातीचे काही दिवस त्यांना आश्वासन देवून बोळवण केली. मात्र पैसे देवून बराच कालावधी उलटत चालला होता. यामुळे मुथलीफ यांनी घर मिळावे यासाठी संबंधिताकडे तगादा सुरु ठेवला होता. यावेळी त्यांनी ज्याच्यासोबत व्यवहार करत आहोत त्याच्याविषयीची आवश्यक माहिती देखील मिळवलेली नव्हती. अखेर त्यांनी घराऐवजी घरासाठी दिलेली रक्कम परत मिळावी यासाठी त्याच्याकडे पाठपुरावा केला, परंतु टाळाटाळ केली. अखेर दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी संबंधिताकडे पाठपुरावा केला असता त्याने पोबारा केला आहे. यामुळे झालेल्या फसवणुकीची तक्रार खारघर पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार खारघर पोलिसांत सदर व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संबंधित

महापालिकेचा निष्काळजीपणा : संक्रमण शिबिराचा प्रस्ताव धूळखात
शिल्लक घरांची लवकरच विक्री
अध्यात्म - नंदनवन
दुसऱ्या घरावरही मिळणार करदात्याला सवलत
स्वयंपाकघरातील ओटा आणि किचनसायन्स

नवी मुंबई कडून आणखी

धावत्या बसमधून पडून वृद्धाचा मृत्यू
ऐरोलीतील उद्यानाची दुरवस्था
ख्रिश्चन वास्तूमध्ये ईदची नमाज, एकात्मतेचे दर्शन
सोनसाखळी चोरट्यांचा धुडगूस
पांडवकड्यासाठी पर्यटनप्रेमी एकवटले

आणखी वाचा