शहराची सुरक्षा व्यवस्था सक्षम होणार, १४३९ कॅमेऱ्यांचा प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:30 AM2019-06-26T02:30:46+5:302019-06-26T02:31:12+5:30

नवी मुंबई  महापालिका कार्यक्षेत्रामधील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी १४३९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.

Enabling the security of the city, the approval of 1439 cameras | शहराची सुरक्षा व्यवस्था सक्षम होणार, १४३९ कॅमेऱ्यांचा प्रस्ताव मंजूर

शहराची सुरक्षा व्यवस्था सक्षम होणार, १४३९ कॅमेऱ्यांचा प्रस्ताव मंजूर

Next

नवी मुंबई  - महापालिका कार्यक्षेत्रामधील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी १४३९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. यामुळे कॅमेऱ्यांची संख्या १७२१ वर पोहचणार आहे. मुख्य चौक, रस्ते, खाडीकिनारी कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यांची संख्या अजून वाढविण्याची सूचना लोकप्रतिनिधींनी केली आहे.

नवी मुंबईमध्येही घातपाती कारवाईची शक्यता वाढली आहे. उरणमधील खोपटा पुलावरील दहशतवादी कारवाईविषयीचा मजकूर व त्यानंतर पनवेलमध्ये सापडलेला बॉम्ब यामुळे नवी मुंबई परिसरामधील सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे. शहर सुरक्षेसाठी जास्तीत जास्त अत्याधुनिक साधनांचा वापर करणे आवश्यक असल्यामुळे महापालिकेने सात वर्षांपूर्वीच शहरात २८२ कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेºयाचे नियंत्रण पोलीस मुख्यालयामधून केले जात असून त्यामुळे अनेक मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. जुईनगरमधील बँक आॅफ बडोदा दरोडा प्रकरणातील आरोपीही कॅमेºयांमुळे सापडण्यास मदत झाली होती. याशिवाय अनेक घरफोडी, वाहनचोरी व इतर गुन्ह्यांमधील आरोपीही त्याचमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात १४३९ कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

यामध्ये शहरातील रोड, चौक व वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी ९५४ हाय डेफिनेशन कॅमेरे बसविण्याचाही समावेश आहे. ३९६ ठिकाणी पीटीझेड कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. वाहनांच्या गतीवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्या नंबरप्लेटची नोंद ठेवण्यासाठी ८० स्पीडिंग कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तब्बल ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स व १२६ ठिकाणी पब्लिक अनाउन्समेंट सुविधा असणार आहे. ५९ ठिकाणी डायनामिक मेसेजिंग साइनचा वापर केला जाणार आहे. नवी मुंबईला दिवा ते दिवाळे दरम्यान २२ किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा लाभला आहे. खाडीकिनाºयावर ९ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविले जाणार आहेत.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये १४३९ कॅमेरे बसविणे व त्यांचे परिचलन करण्यासाठी १५४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. सर्वसाधारण सभेमध्ये या प्रस्तावावर लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. प्रस्तावामध्ये कॅमेºयांची किंमत दिली नाही. कुठे बसविणार त्या ठिकाणांची माहिती दिली नसल्याचे काही नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. रोड, चौक व इतर महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविले जाणार आहेत.

सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करणे महत्त्वाचे आहे. शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व पोलिसांनी सुचविलेल्या ठिकाणांवर कॅमेरे बसविले जाणार आहेत. प्रभाग समिती निधी कॅमेºयांसाठी वापरता यावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. सिडको, एमआयडीसीसारख्या संस्थांनी यासाठी निधी द्यावा, यासाठी प्रयत्न केला जाईल.
- डॉ. रामास्वामी एन.,
आयुक्त, महापालिका

महापालिका कार्यक्षेत्रामधील सर्वांची सुरक्षा महत्त्वाची असून, त्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे वाढविले पाहिजे. नगरसेवकांनी प्रभाग आणि नगरसेवक निधीमधून कॅमेरे बसविण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असून प्रशासनाने त्या विषयी शासनाकडे पाठपुरावा करावा.
- जयवंत सुतार, महापौर

उद्यानांमध्ये गांजा व इतर अमली पदार्थ ओढणाºयांचा वावर वाढला आहे. यामुळे उद्याने, मैदान व तलाव परिसरामध्ये सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात.
- रंगनाथ औटी,
प्रभाग-८४

सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रस्तावाची विनाविलंब अंमलबजावणी करण्यात यावी. सुरक्षेसाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे.
- सूरज पाटील, नगरसेवक,
राष्ट्रवादी काँगे्रस

शहरवासीयांची सुरक्षा महत्त्वाची आहे. प्रशासनाने आणलेला प्रस्ताव त्यासाठी योग्य असून शहरातील काही ठिकाणी कॅमेरे बसविणे आवश्यक आहे.
- आकाश मढवी,
प्रभाग १४

प्रशासनाने आणलेला सीसीटीव्हीचा प्रस्ताव परिपूर्ण आहे. यापूर्वी बसविलेल्या कॅमेºयांचाही योग्य वापर करणे आवश्यक आहे.
- डॉ. जयाजी नाथ, प्रभाग १०४

महिलांची वर्दळ असलेल्या मार्केट व इतर महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात यावेत.
- सुनीता मांडवे, प्रभाग-८७
शाळा, कॉलेज, तलाव, उद्यानांमध्ये कॅमेरे बसविणे आवश्यक असून ते बसविताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे.
- सुनील पाटील, प्रभाग ९२

शहरातील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असून प्रत्येक कोपºयामध्ये व चौकामध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत.
- नामदेव भगत, प्रभाग-९३

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव तयार केला असून, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल.
- रवींद्र इथापे, सभागृहनेते १००
शहरात घरफोडी व चोरीचे प्रमाण वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरी वसाहतीमध्येही कॅमेरे बसविण्यात यावेत.
- रामदास पवळे, प्रभाग- ४९

महिलांच्या सुरक्षेसाठी भाजी आणि मच्छी मार्केटमध्येही कॅमेरे बसविण्यात यावेत. कॅमेरे नक्की कोठे बसविले जाणार याचा स्पष्ट उल्लेख प्रस्तावात असावा.
- रामचंद्र घरत, गटनेते, भाजप

सीबीडीमधील तलाव परिसरामध्ये मद्यपी व व्यसनी तरुण बसलेले असतात. तेथील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे.
- सुरेखा नरबागे, प्रभाग-१०३

महापालिका कार्यक्षेत्रामधील गावठाणांच्या सुरक्षेसाठीही ठोस उपाययोजना हव्यात. कॅमेरे बसविण्याच्या यादीमध्ये गावांचाही समावेश व्हावा.
- ज्ञानेश्वर सुतार, प्रभाग- ८९

सीसीटीव्हीची आवश्यकता गावठाण परिसरामध्ये जास्त आहे. यामुळे महापालिकेने कॅमेरे बसविण्याचे नियोजन करताना गावांचा विचार करावा.
- सोमनाथ वास्कर, प्रभाग- ७४

तुर्भे परिसरामध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची अत्यंत आवश्यकता आहे. आम्हीही त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला असून या प्रस्तावामध्ये या परिसराचा समावेश करावा.
- शुभांगी पाटील, प्रभाग-६७

नगरसेवक व प्रभाग समिती निधीमधून कॅमेरे बसविण्यासाठी दहा लाख रुपये खर्चाची परवानगी मिळावी. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये कॅमेºयांचे जाळे निर्माण करता येईल.
- अविनाश लाड, प्रभाग-६०

Web Title: Enabling the security of the city, the approval of 1439 cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.