एनएमएमटीच्या सेवेत येणार इलेक्ट्रीक बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:29 AM2018-07-10T04:29:35+5:302018-07-10T04:29:48+5:30

एनएमएमटीच्या ताफ्यात लवकरच ३० नव्या इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्याकरिता शुक्रवारी झालेल्या बैठकीत अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती परिवहन सभापती प्रदीप गवस यांनी दिली.

Electric bus coming to NMMT's service | एनएमएमटीच्या सेवेत येणार इलेक्ट्रीक बस

एनएमएमटीच्या सेवेत येणार इलेक्ट्रीक बस

Next

नवी मुंबई - एनएमएमटीच्या ताफ्यात लवकरच ३० नव्या इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्याकरिता शुक्रवारी झालेल्या बैठकीत अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती परिवहन सभापती प्रदीप गवस यांनी दिली. याकरिता शासनाच्या फेम योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त होणार आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेची परिवहन सेवा तोट्यात चालत असली, तरीही प्रवाशांच्या सोयीसाठी सतत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यानुसार आगामी काळात एनएमएमटीच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल करून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याकरिता अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याकडे प्रस्ताव मांडला असता, त्यास हिरवा कंदील मिळाल्याची माहिती परिवहन सभापती प्रदीप गवस यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात सदर खात्याकडे हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु सद्यस्थितीला मोठ्या शहरांनाच इलेक्ट्रीक बस देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. परंतु मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांच्या स्पर्धेत नवी मुंबई असल्याने शहरातील दळणवळण व्यवस्थाही अद्ययावत होत आहे. त्यानुसार एनएमएमटी प्रशासनाने त्यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाचा अहवाल सादर करून तो ६ जुलै रोजी झालेल्या बैठकीत मांडला होता. या सादरीकरणातील मुद्द्यांच्या आधारे अवजड व सार्वजनिक उद्योग केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी एनएमएमटीला ३० इलेक्ट्रीक बस देण्यास हिरवा कंदील दाखवल्याचे परिवहन सभापती प्रदीप गवस यांनी सांगितले. केंद्राच्या फेम योजनेअंतर्गत अनुदानातून या बस मिळणार आहेत. त्यानुसार आगामी काळात एनएमएमटीच्या ताफ्यात नव्या ३० इलेक्ट्रीक बस दाखल होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Electric bus coming to NMMT's service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.