पनवेल प्रभाग समिती सभापतींची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:43 AM2019-05-07T02:43:51+5:302019-05-07T02:44:12+5:30

पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १० मे रोजी आयुक्तांच्या दालनात प्रभाग समितीच्या बैठकीत निवडणूक होऊन नव्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे.

 Election of Panvel Ward Committee Chairman | पनवेल प्रभाग समिती सभापतींची निवडणूक

पनवेल प्रभाग समिती सभापतींची निवडणूक

Next

पनवेल : पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १० मे रोजी आयुक्तांच्या दालनात प्रभाग समितीच्या बैठकीत निवडणूक होऊन नव्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. ८ मे रोजी सभापतीपदासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे विद्यमान चार सभापतींना सभापतीपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.
महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा नेमण्यात आलेल्या प्रभाग समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून नव्या सभापतींची निवड करण्यासाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेच्या नगरसचिवांनी निवडणूक जाहीर केली आहे. मात्र काही वेळा आचारसंहितेचा फटका तर कार्यालय उपलब्ध नसल्याने बैठकाही घेता न आल्याने सभापतींना आपल्या पदाला न्याय देता आलेला नाही. या सर्व घडामोडीत कार्यकाळ संपुष्टात आल्याने सभापतीमध्ये नाराजी आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर महापालिका क्षेत्रात ४ प्रभाग समित्या स्थापन करण्यात आल्या. अ, ब, क, ड अशा चार समित्यांचे सभापतीपद आपल्याकडे घेण्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये चुरस होती. चारही सभापतीपद आपल्याकडे राहतील या दृष्टीने भाजपने प्रभाग समित्यांची रचना केली होती.
या विरोधात शेकापने न्यायालयात धाव घेतली आहे. वर्षभरापासून यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. सध्याच्या घडीला अ प्रभागाचे सभापती अभिमन्यू पाटील, ब प्रभागाचे एकनाथ गायकवाड, क दिलीप पाटील आणि ड प्रभागाचे चंद्रकांत पाटील असे सभापती आहे. या सर्वांना पायउतार व्हावे लागते की पुन्हा या पदावर काम करण्याची संधी मिळेत, हे येत्या पाच दिवसांत ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, पक्षांतर्गत नाराज नगरसेवकांना सभापतीपद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याची चर्चा सध्या पाहावयास मिळत आहे.

Web Title:  Election of Panvel Ward Committee Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.