Harbour Train Update: खारघर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बिघाड, हार्बर पुन्हा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 10:19 AM2018-10-01T10:19:00+5:302018-10-01T10:34:03+5:30

ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

during seawoods-belapur rails cracks harbour railway line disrupted | Harbour Train Update: खारघर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बिघाड, हार्बर पुन्हा विस्कळीत

Harbour Train Update: खारघर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बिघाड, हार्बर पुन्हा विस्कळीत

Next

नवी मुंबई - सोमवारी (1 ऑक्टोबर ) सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी हार्बर रेल्वे मार्गावर सीवूड्स ते बेलापूर स्थानकादरम्यान अप मार्गावर रुळाला तडे गेल्याची घटना समोर आली होती. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यानंतर आता खारघर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  

आठवड्याच्या सुरुवातीलाच हार्बर रेल्वे मार्गावर हा बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. ऑफिस कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावार पोहोचण्यास उशीर होणार आहे. सीवूड्स ते बेलापूर मार्गावर रुळाला तडे गेले असल्याने रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा वाहतूक विस्कळीत झाल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: during seawoods-belapur rails cracks harbour railway line disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.