तरुणीची छेड काढणाºयाला कोठडी, मानसिक संतुलन बिघडल्याने केले कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 02:32 AM2018-02-25T02:32:05+5:302018-02-25T02:32:05+5:30

तुर्भे रेल्वेस्थानकात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केलेला नरेश जोशी (४२) याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गुरुवारी सकाळी त्याने फलाटावर रेल्वेच्या प्रतीक्षेत थांबलेल्या तरुणीचा विनयभंग केला होता. दरम्यान, नरेशवर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे केला आहे.

Due to the abduction of the woman, the act done by spoiling the mental balance | तरुणीची छेड काढणाºयाला कोठडी, मानसिक संतुलन बिघडल्याने केले कृत्य

तरुणीची छेड काढणाºयाला कोठडी, मानसिक संतुलन बिघडल्याने केले कृत्य

Next

नवी मुंबई : तुर्भे रेल्वेस्थानकात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केलेला नरेश जोशी (४२) याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गुरुवारी सकाळी त्याने फलाटावर रेल्वेच्या प्रतीक्षेत थांबलेल्या तरुणीचा विनयभंग केला होता. दरम्यान, नरेशवर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे केला आहे. ठाण्याकडे जाणाºया रेल्वेची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला जबरदस्ती मिठी मारून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी घडला होता. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये पाहताच, आरपीएफच्या दोघा जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. वाशी रेल्वे पोलिसांनी जोशी याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. या वेळी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
नरेश जोशी हा आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह घणसोली येथे भाड्याने राहतो. या प्रकारानंतर तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी वाशी रेल्वे पोलिसांकडे केला आहे. त्याच्यावर औषधोपचार सुरू असून, काही दिवसांपासून त्याने औषध घ्यायचे थांबवले होते. यामुळे मानसिक संतुलन बिघडून त्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Web Title: Due to the abduction of the woman, the act done by spoiling the mental balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा