खड्ड्यांमुळे घोट नदीवरील प्रवास धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 03:05 AM2018-07-18T03:05:05+5:302018-07-18T03:05:08+5:30

तळोजातील घोट नदी पुलावरून पलटी झालेल्या कारमधील चौघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.

Droughts on Khot river can be dangerous due to potholes | खड्ड्यांमुळे घोट नदीवरील प्रवास धोकादायक

खड्ड्यांमुळे घोट नदीवरील प्रवास धोकादायक

googlenewsNext

- शैलेश चव्हाण 
तळोजा : तळोजातील घोट नदी पुलावरून पलटी झालेल्या कारमधील चौघांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ज्या प्रकारे कार नदीत बुडाली ते पाहून परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पुलाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांची सांगितले.
घोट नदीवरील पुलावरून दररोज ५०० ते ७०० गाड्यांची वाहतूक होते. पुलाला सुरक्षा कठडे नसल्याने चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वीस वर्षे जुन्या पुलाची सध्या दुरवस्था झाली आहे. वाहतुकीस अरुंद पूल, त्यात पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पूल अधिकच धोकादायक बनला आहे.
घोट पुलाच्या डागडुजीबाबत पनवेलच्या महासभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. मात्र याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. किंवा ग्रामस्थांच्या बातमीची दखलही घेण्यात आलेली नाही.
- ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक, प्रभाग१
घोट नदी पुलावरून कार प्रवाहात बुडाल्याच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूल कमकुवत झाला असून सुरक्षा कठडे नसल्याने धोकादायक बनला आहे. वेळीच दखल न घेतल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- पांडुरंग निघुकर, माजी सरपंच, घोट ग्रामपंचायत
हा पूल शेवटची घटका मोजत असून लवकरात लवकर डागडुनी न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवण्यात येत आहे.
नदीवरील पुलाची पाहणी करून लवकरच देखभाल दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येईल.
- जमीर लेंगरेकर,
उपायुक्त, पनवेल महानगर पालिका

Web Title: Droughts on Khot river can be dangerous due to potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.