Do not wait for ministers to inaugurate - Vinod Tawde | उद्घाटनासाठी मंत्र्यांची वाट पाहू नका - विनोद तावडे

पनवेल  -  क्रीडा संकुल तयार झाल्यावर मंत्री येईपर्यंत उद्घाटनाची प्रतीक्षा करू नका. १५ दिवसांचा कालावधी मंत्र्यांना द्या. त्या कालावधीत मंत्री न आल्यास क्रीडा संकुलाचे उद्घाटन उपसंचालक व स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत पार पाडून संकुलाचे लोकार्पण करावे, असे आदेश राज्याचे शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी क्र ीडा व युवक सेवा उपसंचालक एन. बी. मोटे यांना दिले. राज्यात अनेक क्रीडा संकुले तयार असून, गेल्या सहा महिन्यांपासून मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होत असून, ही मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाची संस्कृती बंद करण्यासाठी नव्याने जीआर काढण्याचे आदेश या वेळी तावडे यांनी दिले.
पनवेल तालुका क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, तालुका क्र ीडा संकुलाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, बाळासाहेब पाटील, उपमहापौर चारु शीला घरत, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर, क्रीडा विभाग कार्यकारी अधिकारी कविता नाबंदे, तहसीलदार दीपक आकडे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक एन. बी. मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, छत्रपती पुरस्कार विजेते संजय कडू, महिला व बाल कल्याण दर्शना भोईर, झोपडपट्टी पुनर्विकास सभापती प्रकाश बिनेदार आदींसह नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी उपस्थित होते.
पनवेलमध्ये क्रिकेट खेळणारे भरपूर खेळाडू आहेत. मुंबईतील वेंगसरकर यांच्या क्रि केट अकादमीत ४० टक्के खेळाडू पनवेलचे आहेत. त्यामुळे वेंगसरकर यांना पनवेलमध्ये अकादमी सुरू करण्याची विनंती केली होती. त्या वेळी मैदान नसल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर, बाळाराम पाटील यांच्यासह सिडकोशी बोलणी केल्याचे तावडे यांनी सांगितले. राज्यातून दहा खेळाडू आॅलिम्पिकसाठी खेळले. मात्र, त्यांना पदक मिळविता आले नाही, त्यामुळे या स्पर्धेनंतर या सर्व खेळाडूंसोबत चर्चा करण्यात आली. आगामी आॅलिम्पिकमध्ये यश मिळविण्यासाठी निवड करण्यात आलेल्या ६० खेळाडूंना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे तावडे म्हणाले. कार्यक्रमात तावडे यांनी उपस्थित खेळाडू, पालक, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या.

आॅलिम्पिकच्या धर्तीवर खेळाडूंना प्रशिक्षण, तसेच सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रत्येक खेळाडूमागे राज्य सरकार प्रत्येकी पाच लाख रु पये खर्च करणार आहे. क्र ीडा क्षेत्रात विशेष योगदान देणाºया खेळाडूंना शासनाच्या नोकरीत पाच टक्के कोटा ठेवला जाईल.
- विनोद तावडे,
शिक्षण व क्रीडामंत्री


Web Title:  Do not wait for ministers to inaugurate - Vinod Tawde
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.