Demand for the wages of workers in the Raigad Security Board | रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांच्या वेतनवाढीची मागणी
रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांच्या वेतनवाढीची मागणी

पनवेल : नवी मुंबईतील सुरक्षारक्षकांप्रमाणेच रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना वेतनवाढ आणि सुविधा मिळाव्यात, अशी मागणी भाजपा रायगड जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे केली आहे.

रायगड सुरक्षा मंडळातील व नवी मुंबई मंडळातील सुरक्षारक्षकांच्या वेतनात व सुविधांमध्ये फरक आहे. ‘समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे’ या उद्देशावर रायगड जिल्ह्यातील सुरक्षारक्षकांना वेतनवाढ व इतर सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठीचे निवेदन घरत यांनी रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांना दिले. यावेळी वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस मोतीलाल कोळी, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, भाजपा कामगार आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील, भाजपा कामगार आघाडीचे रायगड जिल्हा चिटणीस जगदीश म्हात्रे उपस्थित होते.


Web Title: Demand for the wages of workers in the Raigad Security Board
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.