उरण नगरपरिषदेच्या आमसभेत अधिकारी-नागरिकांत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:27 AM2018-10-02T03:27:23+5:302018-10-02T03:27:39+5:30

जेएनपीटी सिडको प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला साडेबारा टक्के भूखंड वितरणाचा प्रश्न, तालुक्यातील अनेक गावांना जाणविणारी भीषण पाणीटंचाई,

Conflict in Uran municipal council meeting | उरण नगरपरिषदेच्या आमसभेत अधिकारी-नागरिकांत खडाजंगी

उरण नगरपरिषदेच्या आमसभेत अधिकारी-नागरिकांत खडाजंगी

googlenewsNext

उरण : जेएनपीटी सिडको प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला साडेबारा टक्के भूखंड वितरणाचा प्रश्न, तालुक्यातील अनेक गावांना जाणविणारी भीषण पाणीटंचाई, विजेचा सुरू असलेला लपंडाव, उरणकरांसाठी डोकेदुखी ठरू पाहणारी वाहतूककोंडीची समस्या, वाढती बेरोजगारी, जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातील वादग्रस्त नोकरभरती, रस्ते दुरुस्ती बांधणीत अपयशी वादग्रस्त ठरलेले ठेकेदारांनाच पुन्हा देण्यात येत असलेली कामे, अनधिकृत कंटेनर यार्ड, सातत्याने गैरहजर राहणारे शासकीय अधिकारी आदी अनेक प्रश्नांवर सोमवारी झालेल्या आमसभेत जोरदार चर्चा झाली.

उरण तालुक्यात १९८० पासूनच औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली ती आजतागायत सुरूच आहे. ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल, उरण वायू विद्युत केंद्र, सिडको, नौदल शस्त्रागार आदी विविध शासकीय प्रकल्पावर आधारित शेकडो कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. सिडकोने जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी व नवी मुंबईच्या निर्मितीसाठी येथील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संघर्षानंतरही जबरदस्तीने कवडीमोल भावाने संपादन केल्या. शेतकºयांच्या कडव्या संघर्षानंतर प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकºया, विविध प्रकल्पांमध्ये रोजगार, साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याची आश्वासने शासनाच्या वतीने देण्यात आली. मात्र शासनाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे अद्याप तरी शक्य झाले नाही.
जेएनपीटी कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात आ. मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आमसभेप्रसंगी उरण पंचायतीचे सभापती नरेश घरत, उपसभापती वैशाली पाटील, राजिप सदस्य विजय भोईर, बाजीराव परदेशी, सदस्या कुंदा ठाकूर, उपसमिती सदस्य दीपक ठाकूर, हिराजी घरत आदी इतर मान्यवरांसह उरण तहसीलदार कल्पना गोडे, गटविकास अधिकारी नीलम गाडे, आदी उपस्थित होते. विजेचा प्रश्न उपस्थित होताच भेडसाविणाºया विजेच्या अनेक प्रश्नांवर नागरिकांनी वीज अधिकाºयांना घेरले. ग्रामीण भागातील गंजलेले विजेचे पोल बदलण्याची मागणी उरणकरांची आहे. शैक्षणिक समस्या, दररोज डोईजड होत चाललेली वाहतुकीची कोंडी, खड्डेमय रस्ते, वाढते अपघात, अनधिकृत कंटेनर यार्ड, तहसील, पोलीस विभागातील बोकाळलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, पाणजे गाव आणि रानसई आदिवासी वाडीचाच नव्हे संपूर्ण तालुक्यातील विजेचा प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर, कृष्णा पाटील, संतोष ठाकूर, संजय ठाकूर, सुरेश पाटील आदी ग्रामस्थांनी आवाज उठवला.

Web Title: Conflict in Uran municipal council meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.