नवी मुंबईत स्वच्छतेची तिमाही स्पर्धेचे आयोजन; महापालिकेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:07 PM2019-06-18T23:07:02+5:302019-06-18T23:07:23+5:30

नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

For conducting Cleanliness Quarterly competition in Navi Mumbai; Municipal activities | नवी मुंबईत स्वच्छतेची तिमाही स्पर्धेचे आयोजन; महापालिकेचा उपक्रम

नवी मुंबईत स्वच्छतेची तिमाही स्पर्धेचे आयोजन; महापालिकेचा उपक्रम

Next

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यात प्रथम आणि देशात सातव्या क्रमांकाच्या मानांकनासोबत नागरिकांचा प्रतिसादक्षेत्रात देशात सर्वोत्तम शहराचा बहुमान नवी मुंबई शहराला मिळाला आहे. नागरिकांच्या सक्रि य सहभागातून हा नावलौकिक कायम राहावा, या भूमिकेतून महापालिकेमार्फत स्वच्छताविषयक उपक्र म राबविले जात आहेत. या अनुषंगाने शहरात स्वच्छता तिमाही स्पर्धा राबविण्यात येणार असून, या स्पर्धेमध्ये नागरिकांनी सक्रि य सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरण व प्रक्रि या तसेच इतर स्वच्छताविषयक उपक्र म राबविण्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच यामध्ये सातत्य ठेवून रहिवाशांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने शहरातील हॉटेल्स, शाळा, गृहनिर्माण संस्था, मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालय व हॉस्पिटल्स या सहा गटांमध्ये प्रत्येक तीन महिन्यांमध्ये म्हणजे जून-२०१९, सप्टेंबर-२०१९ व डिसेंबर-२०१९ या महिन्यांत खुल्या पद्धतीने ‘स्वच्छता स्पर्धा’चे आयोजन करण्यात येत आहे. सदर स्पर्धेचे गुणांकन करण्याकरिता निकष निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण, कचऱ्यावर कचरानिर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रि या करणे, शौचालय व्यवस्था, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा, अशा विविध बाबींवर भर देण्यात आला आहे. स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाºया संस्थांना १५ जून ते २० जून २०१९ या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज करता येणार आहेत. सदर स्वच्छता स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन २१ जून ते २६ जून २०१९ या कालावधीत विभागस्तरावर करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता विभागस्तरावर व महापालिका स्तरावर निवड करण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकाच्या स्वच्छ गृहनिर्माण संस्था आणि शाळा या दोन्ही गटात रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार असून हॉटेल, हॉस्पिटल्स या विभागातील प्रथम व द्वितीय विजेत्या संस्थांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. जून २०१९ मधील या प्रथम तिमाही स्वच्छता स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ नवी मुंबई मिशन यशस्वीपणे राबविण्यासाठी सक्रि य सहभाग नोंदविण्याचे आवाहन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.
 

Web Title: For conducting Cleanliness Quarterly competition in Navi Mumbai; Municipal activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.