रस्त्यावरील भंगार वाहनांचा स्वच्छ भारत अभियानात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:06 PM2018-12-03T23:06:06+5:302018-12-03T23:06:06+5:30

पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानासमोर भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे.

The clearance of the scratches on the street is prohibited by Swachh Bharat Abhiyan | रस्त्यावरील भंगार वाहनांचा स्वच्छ भारत अभियानात अडथळा

रस्त्यावरील भंगार वाहनांचा स्वच्छ भारत अभियानात अडथळा

Next

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानासमोर भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे. मुख्य व अंतर्गत रोडवर शेकडो भंगार वाहने धूळखात पडली असून त्यांची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला पडला आहे.
भंगार वाहनांची सर्वात गंभीर समस्या पनवेल परिसरामध्ये आहे. प्रत्येक रोडवर व गल्लीमध्ये वापरात नसलेली वाहने उभी करण्यात आली आहेत. काही ठिकाणी एक वर्षापेक्षा जास्त काळ भंगार वाहने उभी असून ती सडू लागली आहेत. नादुरुस्त वाहनांकडे मालक फिरत नाहीत व त्यांची विल्हेवाट लावण्याची काहीही यंत्रणा महानगरपालिकेकडे नाही. पनवेल पालिकेला कचरा व्यवस्थापनासाठी व्यवस्थित यंत्रणा उभारता आलेली नाही अशा स्थितीमध्ये भंगार कोणी उचलयाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण रुग्णालय, नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली,एमआयडीसी व इतर ठिकाणीही मोठ्याप्रमाणात रोडवर वाहनांचे सांगाडे उभे आहेत. अद्याप पालिकेने त्याचे सर्वेक्षणही केलेले नाही. यामुळे साफसफाई करण्यामध्ये अडथळे निर्माण होवू लागले आहेत. नागरिकांनी रोडवर एखादे वाहन उभे केले की वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत. पण भंगार गाड्या उचलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने व पोलिसांनी भंगार वाहनांचा लिलाव करावा अशी मागणीही केली जात आहे. उरण परिसरामध्येही ही समस्या गंभीर होवू लागली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी शहरातील भंगार वाहनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश परिमंडळ एक व दोन मधील अधिकाऱ्यांना दिले होते. या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व बेवारस वाहनांवर नोटीस लावण्यात आल्या व ती उचलून रबाळेमधील एनएमएमटी डेपोच्या जागेवर जावून उभी केली आहेत. परंतु हे भंगार ठेवण्यासाठी जागा कमी पडू लागल्यामुळे पालिकेने सद्यस्थितीमध्येही मोहीम थांबविली आहे.
>सर्वेक्षणाची गरज
महानगरपालिका प्रशासन व पोलिसांनी शहरातील भंगार वाहनांचे संयुक्तपणे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. गाडी मालक कित्येक महिने स्वत:च्या वाहनांकडे फिरकत नाहीत व एका जागेवरून हलवतही नाहीत. अशा वाहनांचा लिलाव करून रोडवरील कचरा दूर करावा अशी मागणी होवू लागली आहे.

Web Title: The clearance of the scratches on the street is prohibited by Swachh Bharat Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार