सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसाठी स्वच्छता स्पर्धा, महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:39 AM2018-08-14T03:39:52+5:302018-08-14T03:40:14+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात देशातील सर्वोत्तम शहराचा बहुमान लाभलेल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय कायमस्वरूपी राहवी, याकरिता मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण केली जात असून, त्यासाठी विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे.

Cleanliness competition for Ganesh Utsav Mandal, Municipal Corporation's decision | सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसाठी स्वच्छता स्पर्धा, महापालिकेचा निर्णय

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसाठी स्वच्छता स्पर्धा, महापालिकेचा निर्णय

googlenewsNext

नवी मुंबई  - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात देशातील सर्वोत्तम शहराचा बहुमान लाभलेल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय कायमस्वरूपी राहवी, याकरिता मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण केली जात असून, त्यासाठी विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे.
देशभरात मोठ्या प्रमाणावर श्रीगणेशोत्सव साजरा होत असून, सार्वजनिक गणेशोत्सवाची फार मोठी परंपरा रूढ आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने निकोप स्पर्धा व्हावी व यामधून स्वच्छतेचा संदेश प्रसारित व्हावा, या दृष्टीने विभागस्तरावर ‘श्रीगणेशोत्सव स्वच्छता स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. १३ ते २३ सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ज्या मंडळांमार्फत पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्तीं (शाडू मातीच्या)ची स्थापना करण्यात येईल, त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने प्रामुख्याने ओला व सुका कचरा वर्गीकरण व त्यावरील प्रक्रि या, स्वच्छता विषयक जनजागृती व पर्यावरणपूरक देखाव्यांचे सादरीकरण, मंडळाच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता, परिसरात वृक्षारोपण मोहिमांचे आयोजन, स्वच्छता विषयक जनजागृतीपर सामाजिक उपक्र म राबविणे, तसेच स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करणे, अशा निकषांचा समावेश आहे.
महानगरपालिकेच्या बेलापूर, नेरु ळ, वाशी, तुर्भे(सानपाडा नोडसह), कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा अशा आठही विभागांमध्ये स्वतंत्रपणे घेण्यात येणार असून, संबंधित सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षण समिती गठित करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत या समितीत सार्वजनिक शौचालय व मलनि:सारण व्यवस्थापन विभागाचे उप अभियंता, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बचतगटाचे प्रतिनिधी, स्वच्छाग्रही हे समिती सदस्य असतील. तसेच संबंधित विभागाचे स्वच्छता अधिकारी समितीचे सदस्य सचिव असतील. या विभागस्तरावरील स्वच्छता स्पर्धेत निवडलेल्या विजेत्या प्रथम व द्वितीय क्र मांक प्राप्त करणाºया गणेशोत्सव मंडळांना अनुक्र मे २० व १० हजार रु पयांचे पारितोषिक प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे. स्वच्छ व सुंदर नवी मुंबईचा ध्यास घेतलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी श्रीगणेशोत्सव उत्साहात साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत उत्सवातून स्वच्छतेचा पर्यायाने आरोग्यपूर्ण समृद्धीचा संदेश प्रसारित करावा व शाडूची गणेशमूर्ती स्थापन करून स्वच्छता स्पर्धा सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Cleanliness competition for Ganesh Utsav Mandal, Municipal Corporation's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.