पनवेलसह शहरात मुसळधार; विविध भागांमध्ये पाणी साचले; ७ ठिकाणी वृक्ष कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 05:10 AM2018-07-04T05:10:58+5:302018-07-04T05:11:12+5:30

मुसळधार पावसाने नवी मुंबईसह पनवेलला झोडपले. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून, महामार्गावर अपघात झाल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

 Cities in the city including Panvel; Water accumulates in different parts; 7 trees fell in place | पनवेलसह शहरात मुसळधार; विविध भागांमध्ये पाणी साचले; ७ ठिकाणी वृक्ष कोसळले

पनवेलसह शहरात मुसळधार; विविध भागांमध्ये पाणी साचले; ७ ठिकाणी वृक्ष कोसळले

Next

नवी मुंबई, पनवेल : मुसळधार पावसाने नवी मुंबईसह पनवेलला झोडपले. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून, महामार्गावर अपघात झाल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पनवेलमध्ये इमारत कोसळण्याचीही घटना घडली आहे.
नवी मुंबईसह पनवेल परिसरामधील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले होते. मुंबईमध्ये रेल्वेपूल कोसळल्यामुळे अनेकांना कार्यालयात पोहोचता आले नाही. हार्बर मार्गावरील लोकलही उशिराने धावत होत्या. सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ पाणी साचल्याचा परिणामही वाहतुकीवर झाला होता. तुर्भे येथे मिनीबसचा अपघात झाल्यामुळे सानपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहारावरही परिणाम झाला होता. भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनांना व नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला होता. मार्केट परिसरामधील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
वारंवार तक्रारी करूनही येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील भुयारी मार्गांमध्येही पाणी साचले होते.
ठाणे-बेलापूर रोडवर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापे येथे भुयारी मार्ग तयार केला आहे; परंतु या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे त्याचा फटका वाहतुकीस बसू लागला आहे.
औद्योगिक वसाहतीमधील नैसर्गिक नाल्यांमध्ये डेब्रिज व इतर कचरा टाकला असल्यामुळे नाल्यातील पाणी रोडवर येऊ लागले आहे. ऐरोलीमधील बस डेपोसह अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पनवेलमध्येही अनेक ठिकाणी पाणी साचल्याची घटना घडली होती. इमारत कोसळल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मलमिश्रीत पाणी रस्त्यावर
मुसळधार पावसामुळे सारसोळे गावामध्ये मलमिश्रीत पाणी रस्त्यावरून वाहत होते. मलवाहिन्या तुंबल्याने जागोजागी ही परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पादचाºयांसह परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी पालिका अधिकाºयांना ही बाब कळवली असता, सफाई कामगारांनी तुंबलेल्या मलवाहिन्या सफाईचे काम हाती घेतले; परंतु पावसाळ्यापूर्वीच जर योग्यरीत्या नाले, गटारे व मल:निसारण वाहिन्यांची साफसफाई झाली असती, तर ही परिस्थितीच उद्भवली नसती. मात्र, अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे सारसोळेवासीयांना दूषित पाण्यातून चालावे लागत असल्याचाही संताप मेहेर यांनी व्यक्त केला.

पावसात खड्डे बुजविण्याचा प्रयत्न
महापालिका अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे शहरात काही ठिकाणी पाऊस सुरू असताना रोड व पदपथांची कामे सुरू आहेत. नेरूळ सेक्टर २० मध्ये रोडचे डांबरीकरण करण्यात आले आहे. गोठविली गावामध्ये मुसळधार पावसामध्ये खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पावसात सुरू असलेल्या या कामाविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकलची
गती मंदावली
पावसामुळे पनवेल-सीएसएमटी तसेच ठाणे-वाशी मार्गावरील लोकलवरही परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे समोरील परिस्थितीचा अंदाज येत नसल्याने लोकल धिम्या गतीने पळवल्या जात होत्या, यामुळे सर्वच लोकल नियोजित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. याचा त्रास रेल्वेप्रवाशांना सहन करावा लागला.

भुयारी मार्गात पाणी
प्रतिवर्षी पावसाळ्यात शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांचे पादचारी, तसेच वाहनांचे भुयारी मार्ग पाण्याखाली जातात. त्यानुसार मंगळवारीही कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगतच्या भुयारी मार्गात सुमारे दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. एरवी त्या ठिकाणी साचणारे पाणी मोटार लावून बाहेर काढले जाते. मात्र, कायमचा तोडगा म्हणून त्या ठिकाणी पाझरणारे पाणी कायमचे बंद करण्याची शक्कल अद्याप अभियंत्यांना सुचलेली नाही, त्यामुळे मंगळवारी पावसाचा जोर वाढताच त्या ठिकाणी पाणी साचून रहदारीच्या मार्गात अडथळा झाला.

वाशीत रस्त्यावर तळे
सेक्टर ९ परिसरातील जलमय होऊन रस्ते पाण्याखाली जात आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांकडून रस्त्यालगतच्या गटारांमध्ये कचरा टाकला जात असल्याने पाणी तुंबून ते रस्त्यावर साचत आहे. परिणामी, मुसळधार पाऊस झाल्यास परिसरातील घरांमध्येही पाणी शिरण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते गणेश मिलखे यांनी व्यक्त केली.

Web Title:  Cities in the city including Panvel; Water accumulates in different parts; 7 trees fell in place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.