नेरुळमधील अतिक्रमणांवर सिडकोची पुन्हा कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 01:24 AM2018-08-22T01:24:57+5:302018-08-22T01:25:22+5:30

अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांच्या विरोधात सिडकोने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच ठेवली आहे

CIDCO's action on encroachment in Nerul | नेरुळमधील अतिक्रमणांवर सिडकोची पुन्हा कारवाई

नेरुळमधील अतिक्रमणांवर सिडकोची पुन्हा कारवाई

Next

नवी मुंबई : अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांच्या विरोधात सिडकोने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच ठेवली आहे. सोमवारी नेरुळ परिसरातील दोन एकर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त केल्यानंतर आज याच विभागाच्या सेक्टर ७ मधील बेकायदा बांधकामांवर हातोडा मारण्यात आला.
नेरुळ-सारसोळेच्या सेक्टर ७ मधील मोकळ्या भूखंडावर अनधिकृत धार्मिक स्थळ व व्यावसायिक शेड्स उभारण्यात आले होते. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यावर कारवाई केली. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रमुख एस.एस.पाटील यांच्या निर्देशानुसार नियंत्रक पी. बी. राजपूत व सहायक नियंत्रक गणेश झिने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

Web Title: CIDCO's action on encroachment in Nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.