सिडकोने शैक्षणिक भूखंड घेतला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:49 AM2018-12-12T00:49:08+5:302018-12-12T00:50:04+5:30

शिक्षण संस्थांना चपराक; अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

CIDCO took educational land back | सिडकोने शैक्षणिक भूखंड घेतला परत

सिडकोने शैक्षणिक भूखंड घेतला परत

Next

नवी मुंबई : घणसोली येथे शैक्षणिक उपक्रमासाठी सवलतीच्या दरात दिलेल्या भूखंडाच्या करारनाम्यातील अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी सिडकोने एका शैक्षणिक संस्थेला दिलेला भूखंड परत घेतला आहे. सिडकोच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अन्य शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले आहेत. सिडकोने जनोद्धार शिक्षण प्रसारक मंडळासोबतचा करारनामा रद्द करून सदर भूखंड पुन्हा स्वत:च्या ताब्यात घेण्याची धडक कारवाई सोमवारी केली. सिडकोच्या या धडक कारवाईमुळे नवी मुंबईतील इतर शिक्षण संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत.

सिडकोने जनोद्धार शिक्षण प्रसारक मंडळाला घणसोली येथे भूखंड क्र मांक-२४४ हा ३५१७ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु करण्यासाठी ३ आॅगस्ट २00४ ला दिला होता. दरम्यानच्या काळात सिडकोच्या सामाजिक सेवा विभागाने केलेल्या पडताळणीत या ठिकाणी तळमजला अधिक सहा मजले, परंतु प्लॅस्टर न करता अर्धवट बांधलेल्या या इमारतीत ट्री हाउस नामक ही त्रयस्थ संस्था शाळा चालवित असल्याचे आढळून आले. तसेच अर्धवट बांधलेल्या या इमारतीला महापालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र देखील प्राप्त झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावून इमारतीचा वापर थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या. तसा अहवाल महापालिकेने सिडकोच्या वसाहत विभागाला दिला होता. या आधारे सिडकोच्या वसाहत विभागाने एप्रिलमध्ये पाहणी करून अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून भूखंड रद्द करण्याची कारवाई का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस संस्थेला बजावली होती. त्यानंतरसुद्धा संबंधित त्रयस्थ संस्थेने इमारतीचा वापर सुरूच ठेवल्याने अखेर ४ मे २0१८ रोजी जनोद्धार शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेला भूखंडाचा करारनामा रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात सिडकोचे सहाय्यक वसाहत अधिकारी, सुरक्षा रक्षक व परिसरातील साक्षीदारांच्या उपस्थितीत भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आल्याचे वसाहत अधिकारी (२) करण शिंदे यांनी सांगितले.

Web Title: CIDCO took educational land back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.