ज्येष्ठांच्या कर्तृत्वाचा सन्मान, नवी मुंबईत उद्या रंगणार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:06 AM2018-04-21T03:06:44+5:302018-04-21T03:06:44+5:30

देशातील ज्येष्ठ नागरिकांची चळवळ नवी मुंबईमधून सुरू झाली. ज्येष्ठ नागरिक धोरण निश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी येथील संघटनांची भूमिका महत्त्वाची आहे.

Celebration of the honor of the senior citizens, in Navi Mumbai tomorrow | ज्येष्ठांच्या कर्तृत्वाचा सन्मान, नवी मुंबईत उद्या रंगणार सोहळा

ज्येष्ठांच्या कर्तृत्वाचा सन्मान, नवी मुंबईत उद्या रंगणार सोहळा

Next

नवी मुंबई : देशातील ज्येष्ठ नागरिकांची चळवळ नवी मुंबईमधून सुरू झाली. ज्येष्ठ नागरिक धोरण निश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी येथील संघटनांची भूमिका महत्त्वाची आहे. याच भूमीत ज्येष्ठांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून चळवळीला चालना देणारा सोहळा ‘लोकमत’ व श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेने रविवार, २२ एप्रिल २०१८ला आयोजित केला आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाºया ज्येष्ठांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रिका आमदार मंदा म्हात्रे यांनी या संकल्पनेविषयी माहिती देताना ज्येष्ठांचा आदर करण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांची चळवळ बळकट करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी व समाजासाठी खर्ची घालणाºया ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळी सुखी व समृद्ध जीवन जगता आले पाहिजे. नवी मुंबई आधुनिक विचारांचे शहर आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना ज्येष्ठांचा आदर करण्याचा आदर्श शहरवासीयांनी निर्माण करून दिला आहे. देशपातळीवरील ज्येष्ठ नागरिकांची चळवळ येथून सुरू झाली आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघटना चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. ज्येष्ठ नागरिक धोरण निश्चित करण्यापासून इतर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध उपक्रम राबविले जात आहेत. ज्येष्ठांच्या या कार्याचा गौरव होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून ज्येष्ठांच्या कर्तृत्वाची माहिती समाजाला होणार असून भविष्यात ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक गतीने काम करणे शक्य होणार आहे.
ज्येष्ठ नागरिक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. काही ठिकाणी ज्येष्ठांनी इच्छामरणाची मागणी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. भविष्यात एकही ज्येष्ठ नागरिकांच्या मनात इच्छामरणाचे विचार येऊ नयेत. आपण एकटे आहोत. आपली देखभाल करणारे कोणीच नाही. शासनस्तरावर आपले प्रश्न सोडविले जात नाहीत. आयुष्यभर कुटुंबासह समाजाला आधार दिला. समाजाच्या देशहितासाठी प्रयत्न केले; पण आयुष्याच्या शेवटी एकटेपणाचे जीवन जगावे लागू नये, यासाठीची यंत्रणा उभी करण्याची सुरुवात या सत्कार सोहळ्यापासून होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्यासाठी महापालिकेने वृद्धाश्रम सुरू करावेत, वैद्यकीय सुविधा, करमणूक, विरंगुळा केंद्र व घरात एकटे असणाºया नागरिकांसाठी काय उपाययोजना करता येतील, याविषयीच्या चर्चेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची सुरुवात या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे.
ज्येष्ठपर्वाच्या सत्कार सोहळ्यास प्रत्येकाने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ व श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

नवे ज्येष्ठपर्व
नवी मुंबईमधून ज्येष्ठ नागरिकांच्या चळवळीला सुरुवात झाली आहे. याच भूमीमधून ज्येष्ठांच्या सन्मानाचे नवीन पर्व सुरू होत आहे. या माध्यमातून एक नवीन व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन ते सोडविण्यासाठी पाठपुरावा होणार आहे.

आम्ही सोबत आहोत
‘लोकमत’ व गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने ज्येष्ठांचा सत्कार करतानाच या चळवळीला गती देण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. कोणत्याच ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणा वाटू नये. आम्ही सर्व सोबत आहोत, हा विश्वास या कार्यक्रमातून दाखविण्यात येणार आहे.

ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्यासाठी १९९५पासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विधान परिषद व आता विधानसभेत अनेक वेळा आवाज उठविला आहे. आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबरोबर ज्येष्ठ नागरिक संघटनांनाही वेळोवेळी सहकार्य केले आहे. ज्येष्ठांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

Web Title: Celebration of the honor of the senior citizens, in Navi Mumbai tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.