आश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 03:54 PM2017-12-28T15:54:04+5:302017-12-28T15:54:31+5:30

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

Ashwina Bidre missing case: Police commissioner Hemant Nagarale demands co-operation | आश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी 

आश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना सहआरोपी करण्याची मागणी 

Next

पनवेल : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात आम्ही सप्टेंबर २०१६ रोजी  नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती . या भेटीत आम्हाला काहीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही . तसेच कोणतेही  सहकार्य न करता उलट आम्हालाच भीती दाखविण्याचा प्रयत्न नगराळे यांनी केला . या प्रकरणात तुमच्या जीवाला धोका आहे . तुम्ही सावध रहा असे आयुक्तांनी आम्हाला सांगितले . पोलिसांकडे या प्रकरणात कुरुंदकर आरोपी असलेल्या  ऑडिओ व्हिडीओ उपलब्ध असताना देखील या प्रकरणी पोलिसांनी कुरुंदकर विरोधी गुन्हा दाखल केला नव्हता . पोलीस सहकार्य करीत नसल्याने ऑक्टॉबर २०१६ रोजी आम्ही न्यायालयात धाव घेतल्यांनंतर न्यायालयाने यासंदर्भात तपासाला गती दिली .त्यांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर  ३१ जानेवारी २०१७ रोजी अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले . या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने आम्ही १६ नोव्हेंबर २०१७  रोजी प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय आल्यांनतर हा विषय दृष्टीक्षेपात आला . आम्ही ज्यावेळी आयुक्तांना पुराव्याचे  दाखले देत कुरुंदकर यांना अटक करण्याची मागणी केली ते पुरावे सबळ नसल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले . मात्र याच प्रकरणी जेव्हा आम्ही न्यायालयात धाव घेतली तेव्हा या पुराव्यांच्या आधारावर आरोपीना अटक करण्यात आली असल्याचे अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे यांनी सांगितले . या प्रकरणी आयुक्त नगराळे यांनी हे प्रकरण दडविण्याचे प्रयत्न केल्याने त्यांना प्रकरणी सहआरोपी करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत आनंद बिद्रे यांनी केले. 
         ११ एप्रिल २०१६ रोजी संध्याकाळी ८ ते ११ वाजे पर्यंत अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर हे सोबत होते . यांनतर रात्री ११  वाजता अभय कुरुंदकर याने राजेश पाटील ला फोन केला . तेव्हापासून आश्विनी बेपत्ता आहे होत्या  आणि त्यांचा फोन देखील तेव्हापासून बंद होता . यांनतर १४ एप्रिल रोजी केवळ एका व्हाट्अँप मेसेज पाठविण्यापुरता त्यांचा फोन चालू होता . त्यानंतर  अश्विनी बेपत्ता पुन्हा कोणालाच दिसल्या नाहीत असे आनंद बिद्रे यांनी सांगितले . अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण केवळ प्रसार माध्यमांमुळे बाहेर आले . प्रसार माध्यमांनी बातम्या दाखविल्यानांतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असे यावेळी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले . आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपासंदर्भात आयुक्तांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Ashwina Bidre missing case: Police commissioner Hemant Nagarale demands co-operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.