पामबीच रोडला येणार नवी झळाळी, विद्युत व्यवस्थेसाठी ७६ लाख रुपयांची तरतूद; एलईडी दिवे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 02:48 AM2017-09-23T02:48:26+5:302017-09-23T02:48:29+5:30

पामबीच रोडवरील तुटलेले व गंजलेले दिवाबत्तीचे खांब बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ८८ खांब बदलण्यासाठी व एलईडी दिवे बसविण्यासाठी ७६ लाख ४६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

An amount of Rs 76 lakh will be provided for new lighting, electricity system at Palm Beach Road; LED lights will be required | पामबीच रोडला येणार नवी झळाळी, विद्युत व्यवस्थेसाठी ७६ लाख रुपयांची तरतूद; एलईडी दिवे लागणार

पामबीच रोडला येणार नवी झळाळी, विद्युत व्यवस्थेसाठी ७६ लाख रुपयांची तरतूद; एलईडी दिवे लागणार

googlenewsNext

नवी मुंबई : पामबीच रोडवरील तुटलेले व गंजलेले दिवाबत्तीचे खांब बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ८८ खांब बदलण्यासाठी व एलईडी दिवे बसविण्यासाठी ७६ लाख ४६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रातील प्रमुख रोड म्हणून पामबीचची ओळख आहे. कोपरी ते किल्ले गावठाण परिसरामध्ये या रोडवर ४३८ दिवाबत्तीचे खांब आहेत. यामधील २२ खांब तुटले असून ४७ खांब धोकादायक स्थितीमध्ये आहेत. सिडकोने २० वर्षांपूर्वी लावलेल्या विद्युत खांबांची स्थिती बिकट झाली आहे. खांब पडल्याने यापूर्वी अपघात झाले होते. याशिवाय सारसोळे जंक्शनवरून सानपाड्याकडे जाणाºया मार्गावरील लाइट बंद असल्याने वारंवार अपघात होऊ लागले आहेत. गंजलेले खांब तत्काळ बदलले नाहीत तर गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरसेवकांनीही याविषयी वारंवार आवाज उठविला होता. यापूर्वी झालेले अपघात व भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सर्व पामबीच रोडचे सर्वेक्षण करून एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
गंजलेले खांब बदलण्यासाठी ७६ लाख ४६ हजार रुपये खर्चास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. नगरसेवकांनीही हे काम लवकर करण्याची सूचना केली. कामांमध्ये नेरूळ सेक्टर ३८मधील तुटलेल्या ५२ खांबांचा समावेश आहे.
>प्रस्तावित कामांचा तपशील
साहित्याचा तपशील संख्या
११ मीटर लांबीचे खांब फाउंडेशन ६९
९ मीटर खांब फाउंडेशनसह 0९
८ मीटर खांब फाउंडेशनसह १०
डबल आर्म ब्रॅकेट्स १२३
केबल ३५ चौरस मीटर १०५०
केबल ९५ चौरस मीटर ८२०
१७० व्हॅट एलईडी फिटिंग ७२ नग
१०० व्हॅट एलईडी फिटिंग ५६ नग

Web Title: An amount of Rs 76 lakh will be provided for new lighting, electricity system at Palm Beach Road; LED lights will be required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.