प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई; व्यापाऱ्यांकडून दंडवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:36 PM2019-08-03T22:36:26+5:302019-08-03T22:37:00+5:30

तुर्भे, नेरूळसह घणसोलीत धडक मोहीम

Action on plastic users | प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई; व्यापाऱ्यांकडून दंडवसुली

प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई; व्यापाऱ्यांकडून दंडवसुली

Next

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. शहरात प्लास्टिकचा वापर करणार्यांवर महापालिकेच्या माध्यमातून कारवाया करण्यात येत आहेत. शनिवारी 3 आॅगस्ट रोजी तुर्भे, नेरुळ आणि घणसोली विभागाच्या वतीने धडक मोहीम राबवून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्यांवर कारवाया करून दंड वसूल करण्यात आला.

प्लिस्टकमुळे होणारी पर्यावरणाची हानी थांबविण्याच्या दृष्टीने शहरात महापालिकेच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी संकल्पना राबविण्यात येत आहे. प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शनिवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे आण िस्वच्छता निरीक्षक, उपनिरीक्षक यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणा-या व्यावसायिकावर कारवाई करीत 600 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले तसेच 5 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. नेरूळ विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे आण ित्यांच्या सहका-यांनी 250 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले व 5 हजार इतका दंड वसूल केला. तसेच घणसोली विभागातील व्यावसायिक तसेच फेरीवाल्यांवर सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे यांच्या नियंत्रणाखाली, स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर आण िसहका-यांनी कारवाई करीत 16 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले.

20,000 इतकी दंडात्मक रक्कम 4 व्यावसायिकांकडून वसूल करण्यात आली नागरिकांनीच प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केला तर आपोआपच प्लास्टिकला प्रतिबंध होईल प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.

Web Title: Action on plastic users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.