३६७१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:41 AM2018-03-29T01:41:08+5:302018-03-29T01:41:08+5:30

राज्यातील श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई मनपाचा

3671 crore budget sanctioned | ३६७१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

३६७१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

Next

प्राची सोनवणे 
नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई मनपाचा २०१८ - १९ वर्षासाठी ३६७१.०३ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. सर्वसाधारण सभेने अर्थसंकल्पामध्ये तब्बल ३२२ कोटी रूपयांची वाढ केली.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी २० फेबु्रवारीला ३१५० कोटी ९३ लाख रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. चार दिवसांच्या चर्चेनंतर त्यामध्ये तब्बल १९७ कोटी रूपयांची वाढ करून ३३४८ कोटी ९३ लाख रूपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली होती. स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर तीन दिवस चर्चा झाल्यानंतर ३६७१ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी अर्थसंकल्पामध्ये नाला व्हिजनसाठी तरतूद करण्यात यावी, शैक्षणिक संस्थांना क्रीडांगण म्हणून दिलेल्या भूखंडांना कर लावला जाऊ नये. प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांनाही करामध्ये सूट देण्यात यावी. अर्थसंकल्पात तरतूद केलेली कामे पूर्ण करण्यात यावी, अशी भूमिका मांडली.
आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. महापौर जयवंत सुतार यांनी अर्थसंकल्पात तरतूद केलेली कामे प्रशासनाने गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.

पालिकेची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था हवी. गावळीदेव पर्यटनस्थळ विकसित करण्यात यावे. आंबेडकर स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करावे.
- निवृत्ती जगताप, प्रभाग-२९
कोपरखैरणे येथील पावसाळी नाल्याची दुरु स्ती केली जावी. नाला व्हिजन केवळ कागदावर असून ते प्रत्यक्षात अमलात आणले गेले पाहिजे.
- बहादूर बिस्ट, प्रभाग-८
झोपडपट्टी विभागात क्षयरोगाचे रु ग्ण आहेत. गेले दोन महिने क्षयरोगाचे डॉट्स उपलब्ध नाहीत. रुग्णांचे हाल होत आहेत. मोरबे धरणाचे पाणी नवी मुंबई, पनवेलला मिळते. मात्र, अद्याप नवी मुंबईचा भाग असलेल्या दिघ्याला मिळालेले नाही, ही खेदाची बाब आहे.
- दीपा गवते, प्रभाग-३
तरतूद करून एकही रु पया खर्च होत नसल्याने अर्थसंकल्पातील फुगवटा दिसून येत आहे. एपीएमसीतील पानटपऱ्या व ज्यूस सेंटर यांच्याकडून मालमत्ता कर घ्यावा, त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. अमृत अभियान शोभेची झाडे न लावता, अंतर्गत प्राणवायू देणारी, बहरणारी व सावली देणारी झाडे लावावीत.
- सपना गावडे, प्रभाग-९८
प्रभागातील पथदिव्यांची दुरु स्ती करावी. पाण्याची समस्या सोडविण्यात यावी.
- लता मढवी, प्रभाग-४७
सीबीएसई शाळांच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे. याबाबत लेखाशीर्षात त्याबाबत तरतूद करावी. निदान दोन तरण तलाव नवी मुंबई पालिकेंतर्गत तयार करावेत. क्र ीडा शिष्यवृत्ती सुरू करावी.
- विशाल डोळस, प्रभाग-१०८
गावातील प्रवेशद्वार विकसित करण्यात यावेत. मोठ्या व्यासाच्या मलनि:सारण वाहिन्या बसविण्यात याव्यात. समाजमंदिराची पुनर्बांधणी करावी.
- जयश्री ठाकूर, प्रभाग-८६
नगर विकासकामात वाढीव तरतूद करावी. कोपरखैरणे सेक्टर-३ मधील भूखंड हस्तांतरित करून त्यावर महिला वसतिगृह विकसित करावे.
- संगीता म्हात्रे, प्रभाग-४५
नवी मुंबईत सायन्स सिटी झाली पाहिजे आणि यासाठी विशेष तरतूद करावी. प्रत्येक प्रभागात पोलीस चौकीसाठी तरतूद केली जावी.
- हेमांगी सोनावणे, प्रभाग-१७
सद्यस्थितीत मोरबे धरणात पुरेसा जलसाठा आहे आणि हा शाठा शहराकरिता पुरेसा आहे. अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात काही हरकत नसावी. यामुळे २५ ते ३० कोटी उत्पन्नात नक्कीच भर पडेल. ६ वर्षांवरील आयटी कंपनीला जास्त कर लागू केल्यास ५०० कोटींचा फायदा होईल.
- एम. के. मढवी, प्रभाग-१८
शहराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा. सीबीडी ते पारसिक हिलपर्यंत रोप वे करण्यात यावा. यामुळे महसुलात वाढ होईल.
- उषा भोईर, प्रभाग-५६
नगरसेवकांना वाढीव दहा लाखांचा निधी मिळावा. प्रभागांमधील विकासकामांना गती द्यावी.
- तनुजा मढवी, प्रभाग-८३
शहरात पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पार्किंग पॉलिसी राबविण्यात यावी.
- अ‍ॅड. भारती पाटील, प्रभाग-४४
घणसोली नोडमधील विकास कामांना गती देण्यात यावी. रस्ते,गटर व इतर विकास कामे गतीने करण्यात यावीत.
- प्रशांत पाटील, प्रभाग ३२
शहरातील तलावांची स्थिती बिकट झाली असून, सर्वेक्षण करून लवकरात लवकर कामे सुरू करण्यात यावी.
- गणेश म्हात्रे, प्रभाग-१११
वाशीमध्ये अपघात टाळण्यासाठी स्कायवॉकची मागणी केली आहे; परंतु प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. स्कायवॉक व इतर प्रकल्प लवकर मार्गी लावावे.
- प्रकाश मोरे, प्रभाग-५८
विभाग अधिकारी व अतिक्रमण विभागातील कर्मचारी संगनमताने अतिक्रमणास अभय देत असून, पक्षपाती कारवाया थांबविल्या पाहिजेत.
- रामचंद्र घरत, भाजपा गटनेते
ऐरोलीतील भाजी मंडई, वसाहतीअंतर्गत कामे, रस्ते व विकासाचे इतर प्रकल्प वेळेत पूर्ण केले जावेत.
- नंदा कुंदन काटे, प्रभाग-१३
वॉर्ड क्र मांक ६९मध्ये एक तरी शाळा व्हावी, त्याकरिता विशेष तरतूद करावी. उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्यात यावे.
- संगीता वास्के, प्रभाग-६९
अर्थसंकल्पात तरतूद केलेली कामे प्रत्यक्षात झाली पाहिजेत. विकासकामे गतीने मार्गी लागली पाहिजेत.
- मुनावर पटेल, प्रभाग-५५
नागरी विकासकामांवर भर देत कामे लवकरात लवकर पूर्ण कशी होतील, याकडे अधिक लक्ष द्यावे.
- सुनील पाटील, प्रभाग-९२
मुख्य रस्ते, शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत, जेणेकरून गैरप्रकार टाळता येतील.
- अनीता मानवतकर, प्रभाग-२५
महापालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. पुढील वर्षभरामध्ये वेगाने विकासकामे पूर्ण करावी.
- सुनीता मांडवे, प्रभाग-८७
मालमत्ता विभागातून अधिक उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जावा. परवाना विभागातून पालिकेला उत्पन्नात भर घालत येईल.
- सायली शिंदे,
प्रभाग-३७
नेरुळ पूर्व व पश्चिमेला जोडणाºया उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे व प्रभागातील कामांना गती देण्यात यावी.
- रूपाली भगत
७०० स्क्वेअर फुटांच्या घरांना फक्त रेसिडेंशीअल टॅक्स लावण्यात यावा. शहरात एक तरी पक्षी संग्रहालय उभारण्यात यावे. सिडकोने खासगी संस्थांना दिलेल्या जागा वापराविना पडल्या असून, त्यांचा विकास करून नेरु ळमध्ये चांगले उद्यान उभारता येऊ शकते. ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली या ठिकाणी आगरी कोळी सांस्कृतिक भवनाकरिता २५ कोटींची तरतूद करावी. शाळांमध्ये भारतीय विद्यार्थी आहेत का हे तपासावे.
- नामदेव भगत
गावगवठाण परिसरांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकही सोय सुविधा नाही. मालमत्ता कराची वसुली अचूकरीत्या करणे आवश्यक आहे. सिडकोकडून घ्यावयाच्या भूखंडाची तरतूद करणे आवश्यक आहे. शहरात नवीन उड्डाणपूल बनविले पाहिजेत.
- द्वारकानाथ भोईर
प्रवेशद्वारातूनच २९ गावांची ओळख झाली पाहिजे, अशा प्रकारे विकास करावा. शहर स्वच्छता वाखण्याजोगी असून ती यापुढेही अशीच कायम राहावी. चिमण्यांसाठी कृत्रिम घरटे इमारती, खाडीकिनारी लावावे, चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. लोकप्रतिनिधी आश्वासन पूर्ण करू शकतील, अशा गतीने कामे झाली पाहिजेत.
- अनंत सुतार

Web Title: 3671 crore budget sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.