३१ माकडे, १४ कबुतरांचा मृत्यू विषारी वायूने नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:39 AM2019-04-19T05:39:31+5:302019-04-19T05:39:37+5:30

रसायनी येथील हिंदुस्थान ऑर्गनिक केमिकल लिमिटेडच्या मालकीच्या २० एकर जागेवर वसलेल्या इस्रोच्या प्लांटमध्ये १५ डिसेंबर २०१८ रोजी वायुगळती झाली होती.

31 deaths, 14 doomed poisonous toxic gas! | ३१ माकडे, १४ कबुतरांचा मृत्यू विषारी वायूने नाही!

३१ माकडे, १४ कबुतरांचा मृत्यू विषारी वायूने नाही!

Next

पनवेल : रसायनी येथील हिंदुस्थान ऑर्गनिक केमिकल लिमिटेडच्या मालकीच्या २० एकर जागेवर वसलेल्या इस्रोच्या प्लांटमध्ये १५ डिसेंबर २०१८ रोजी वायुगळती झाली होती. त्यात ३१ माकडे व १४ कबुतरांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. यासंदर्भात मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये मृत्यूचे कारण शोधण्यासाठी नमुने पाठविण्यात आले होते. शुक्रवार, १२ एप्रिल रोजी वनविभागाला या संदर्भात अहवाल प्राप्त झाला असून या पशूपक्ष्यांचा मृत्यू विषारी वायूमुळे झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
एचओसीएल, बीपीसीएल व इस्रोच्या अधिकारी व मृत्यदेह पुरणाऱ्या जेसीबी चालक अशा आठ जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी पनवेल येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या शवविच्छेदनात संबंधित माकडे व कबुतरांचा मृत्यू ब्रेनहॅमरेजमुळे झाल्याचा अहवाल दिला होता. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल जरी वेगळा आला असला तरी विषारी वायू जास्त वेळ शरीरात राहत नसल्याने मृत्यूचे कारण अहवालात स्पष्ट झालेले नाही. यापूर्वीच्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट असल्याचे पनवेलचे सहायक वनसंरक्षक नंदकिशोर कुपते यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आठवडाभरात न्यायालयात सर्व पुरावे व वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेला अहवाल सादर करणार असल्याचे कुपते यांनी स्पष्ट केले आहे.
आशिया खंडातील एकमेव प्लांट
रसायनीमधील इस्रोचा हा प्लाट आशिया खंडातील एकमेव प्लांट आहे. येथे नायट्रोजन आॅक्साइड वायू तयार होतो. सॅटेलाइटसाठी लागणारे इंधन म्हणून याचा उपयोग होतो.
असे घडले होते प्रकरण
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल कंपनीत ३१ माकडे व १४ पक्षी गतप्राण झाले. मात्र, मृत्युमुखी पडलेल्या माकडांची कंपनीच्या अधिकाºयांनी थांगपत्ता न लागू देता विल्हेवाट लावली.
लोकमतने हा प्रकार सर्वप्रथम उघड केला. यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांना जाग आली आणि त्यांनी तात्काळ हालचाल करत या घटनेची दखल घेतली.
१३ डिसेंबरला कंपनीच्या इंधनाच्या टाकीतून ही वायुगळती सुरू झाली. या वायुगळतीचा आजूबाजूच्या परिसरातील असंख्य पशू-पक्ष्यांना फटका बसला. तसेच यामुळे कंपनीतले दोन वॉचमनही बेशुद्ध झाले. त्यानंतर कंपनी बंद केली. मृत्यमुखी पडलेल्या सर्व प्राणी आणि पक्ष्यांचे मृतदेह जेसीबीच्या मदतीने मोठा खड्डा करून प्लँटमध्येच पुरण्यात आले.

Web Title: 31 deaths, 14 doomed poisonous toxic gas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.