हार्बर रेल्वे मार्गावर आज 13 तासांचा मेगाब्लॉक, प्रवाशांना सहन करावा लागणार मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 08:13 AM2017-12-25T08:13:03+5:302017-12-25T08:16:04+5:30

हार्बर रेल्वे मार्गावर आज 13 तासांचं ब्लॉक असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे.

A 13-hour megablock on Harbor Rail route | हार्बर रेल्वे मार्गावर आज 13 तासांचा मेगाब्लॉक, प्रवाशांना सहन करावा लागणार मनस्ताप

हार्बर रेल्वे मार्गावर आज 13 तासांचा मेगाब्लॉक, प्रवाशांना सहन करावा लागणार मनस्ताप

Next

नवी मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावर आज 13 तासांचं ब्लॉक असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. उरणच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वेमार्ग सीवूड आणि बेलापूर दरम्यानच्या सध्याच्या रेल्वेमार्गाला जोडण्यात येणार आहे. यासाठी हार्बर मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्याचा हार्बरमार्ग फेज १ प्रकल्प फलाट क्रमांक ४ ला जोडण्यात येणार आहे. 

दरम्यान, बेलापूरच्या पुढे जाणा-या प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण बेलापूरच्या पुढील खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल या स्टेशनवरून प्रवास करणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
हार्बरमार्गावर एकूण 12 नवीन रेल्वेस्टेशन बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच रेल्वेस्टेशन पहिल्या टप्प्यात बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असल्याने वेगाने हे काम पूर्ण करण्यासाठी बेलापूर ते नेरुळपर्यंत ट्राफिक ब्लॉक घेण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली.

...त्यानंतर लोकल पूर्ववत
सोमवार, २५ डिसेंबर रोजी १३ तासांचा विशेष ब्लॉक असून, १०० फे-या रद्द करण्यात आल्या असून याच कालावधीत १०४ विशेष लोकल फे-या चालवल्या जातील. २५ डिसेंबर रोजीचा ब्लॉक दुपारी ३पर्यंत असून, त्यानंतर फे-या पूर्ववत चालतील.

४८२ गाड्यांपैकी १६४ गाड्या रद्द
प्रवाशांचे हाल होऊ नयेत, याकरिता नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाला जादा गाड्या सोडण्याची विनंती करण्यात आली असून प्रवाशांना या बसेसचा आधार घेता येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. सोमवारी पहाटे २ ते दुपारी ३ या काळात नेरुळ ते पनवेल अप आणि डाउन या मार्गावर ट्राफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हार्बरमार्गावरील ४८२ गाड्यांपैकी १६४ गाड्या रद्द करण्यात आाल्या आहेत. तर ट्रान्स हार्बरमार्गावरील २३० गाड्यांपैकी ४० गाड्या रद्द करण्यात आल्या आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

महानगरपालिका परिवहन विभागामार्फत प्रवाशांकरिता अतिरिक्त बससेवेची सुविधा
मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर ट्राफिक ब्लॉकच्या चार दिवसांच्या कालावधीमध्ये परिवहन विभागामार्फत प्रवाशांकरिता अतिरिक्त बससेवेची सुविधा पुरविली जाणार आहे. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा चालू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत बससेवेची आवश्यकता भासणार नाही. मात्र, सोमवार, रविवार मध्यरात्री २ वाजल्यापासून ते सोमवार २५ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नेरूळ ते पनवेल ही लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने पुढीलप्रमाणे बससेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. हार्बर रेल्वेमार्गावरील ब्लॉकदरम्यान वरील चार मार्गांवर ४० बसेस धावतील.
 

Web Title: A 13-hour megablock on Harbor Rail route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.