पाटण्यात मोफत भाजी न देणाऱ्या लहान मुलास टाकले थेट तुरुंगामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:16 AM2018-06-23T04:16:54+5:302018-06-23T04:16:58+5:30

रस्त्यावरील फेरीवाले, लहान दुकानदार, छोटे धाबे येथून पैसे न देता भाज्या, खाद्यान्न, वस्तू घेणारे पोलीस सर्वच ठिकाणी दिसतात.

A young boy who does not pay free vegetable in the street is sent directly to the jail | पाटण्यात मोफत भाजी न देणाऱ्या लहान मुलास टाकले थेट तुरुंगामध्ये

पाटण्यात मोफत भाजी न देणाऱ्या लहान मुलास टाकले थेट तुरुंगामध्ये

googlenewsNext

पाटणा : रस्त्यावरील फेरीवाले, लहान दुकानदार, छोटे धाबे येथून पैसे न देता भाज्या, खाद्यान्न, वस्तू घेणारे पोलीस सर्वच ठिकाणी दिसतात. पान-चहा टपºयांवर अनेक पोलीस फुकटात चहा, पान घेतात.फेरीवालेही काही न बोलता त्यांच्या मागण्या पूर्ण करतात. पण बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरामध्ये मात्र एका मुलाने पोलीस अधिकाºयाला भाजी मोफत देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी त्या मुलाला चक्क तीन महिने तुरुंगात डांबले.
पोलीस अधिकाºयाला आपल्या मुलाने मोफत भाजी देण्यास नकार दिल्याने तो सज्ञान असल्याचे दाखवून व दुचाकी चोरल्याचा आरोप ठेवून पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले, असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हा सारा प्रकार घडला मार्च महिन्यात. माझ्या मुलाला पोलिसांनी घरातून फरपटत नेले, असे त्याचे वडील सुखान पासवान यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले. पासवान व त्यांचा मुलगा पाटण्याच्या गांधी नगर भागात भाजी विकतात. (वृत्तसंस्था)
।अधिकारी गप्प, विषय टाळण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सूचनेनुसार आम्ही या प्रकरणाची चौकशी करीत आहोत, आम्हाला या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती आणि नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याविषयी बोलणे योग्य नाही, असे सांगून वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

Web Title: A young boy who does not pay free vegetable in the street is sent directly to the jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.