'आपण कठीण काळात राहतोय', पोस्ट ग्रॅज्युएट डिलिव्हरी बॉयची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 05:30 PM2019-02-11T17:30:13+5:302019-02-11T18:37:09+5:30

देशातील बेरोजगारीबाबत भाष्य करताना कोलकाता येथील युवक शौविक दत्ता याने सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. तर, मी झोमॅटो अॅपवरुन ऑर्डर केली होती.

'You are living in difficult times', Post Graduate Delivery Boy's Post Viral | 'आपण कठीण काळात राहतोय', पोस्ट ग्रॅज्युएट डिलिव्हरी बॉयची पोस्ट व्हायरल

'आपण कठीण काळात राहतोय', पोस्ट ग्रॅज्युएट डिलिव्हरी बॉयची पोस्ट व्हायरल

googlenewsNext

कोलकाता - आपल्या देशात पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवार लहान-सहान नोकरी करतात, हे नवीन नाही. कामगार, ड्रायव्हर, रिक्षाचालक, कँटीनचालक अशा वेगवेगळ्या भूमिकेतून हे पदवीधर पुढे आले आहेत. मात्र, नुकतेच कोलकाता येथील शौविक दत्ता याने एका पोस्ट शेअर केली असून ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये डिलिव्हरी बॉयचं शिक्षण आणि त्यास अवगत असणाऱ्या भाषेची माहिती देण्यात आली आहे. 

देशातील बेरोजगारीबाबत भाष्य करताना कोलकाता येथील युवक शौविक दत्ता याने सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. तर, मी झोमॅटो अॅपवरुन ऑर्डर केली होती. मात्र, प्रथमच मला ही ऑर्डर घेल्यानंतर अवस्थ वाटत आहे. कारण, माझ्या दारावर ऑर्डर घेऊन आलेल्या मुलाने दरवाज्यातून मला आवाज दिला. त्यावेळी, मी पार्सल घेण्यासाठी गेलो. सर, हे घ्या तुमचं पार्सल असं म्हणत हलकसं स्माईल या डिलिव्हरी बॉयनं दिलं. त्यानंतर, प्लीज तुम्ही मिळालेल्या सर्व्हीसला अॅपद्वारे रेटींग स्टार द्या, असं त्यानं म्हटलं. त्यावेळी ऑर्डर देणाऱ्या मुलांने डिलिव्हरी बॉयचं शिक्षण पाहताच, त्यास धक्का बसला. कारण, डिलिव्हरी बॉय कोलकाता विद्यापीठातून एम.कॉम. पदव्युत्तर पदवीधारक होता. तसेच, फायनान्स आणि इनव्हेस्टमेंट बँकिंगमध्ये त्यानं पीजीडीएमचा कोर्सही पूर्ण केला होता. त्यामुळे मला अस्वस्थ वाटल्याचे ऑर्डर मागवणाऱ्या अल्पवयीन मुलाने म्हटलं आहे. तसेच, देशातील बेरोजगारीची परिस्थिती वाईट आहे. देश बदलायला हवा, राज्य बदलायला हवां, नोकऱ्या निर्माण व्हायला हव्यात. आपण, कठीण काळात राहतोय, असं लिहून या मुलाने फेसबुकवरुन आपलं दु:ख व्यक्त केलं. त्यानंतर, या मुलाची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. 

ऑर्डर देणाऱ्या मुलानं लिहिलेली वाक्ये...!

This country needs to change
This State needs to change 
Jobs need to be created,we are living through difficult times
This country needs to change.

 

Web Title: 'You are living in difficult times', Post Graduate Delivery Boy's Post Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.