यूपीमध्ये योगींनी मारली बाजी; ९ जागांवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:57 AM2018-03-24T04:57:45+5:302018-03-24T04:57:45+5:30

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या नऊ जागा जिंकून भाजपाला राज्यसभेतील बळ वाढविण्यात यश आले असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा धमाका करून दाखवला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपाचे सर्व नऊ उमेदवार राज्यसभेवर निवडून आले आहेत.

Yogis beat UP in UP; 9 Wins | यूपीमध्ये योगींनी मारली बाजी; ९ जागांवर विजय

यूपीमध्ये योगींनी मारली बाजी; ९ जागांवर विजय

googlenewsNext

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या नऊ जागा जिंकून भाजपाला राज्यसभेतील बळ वाढविण्यात यश आले असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा धमाका करून दाखवला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपाचे सर्व नऊ उमेदवार राज्यसभेवर निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लागले होते. सपाच्या पदरात एक जागा पडली व बसपाच्या उमेदवाराचा पराभव झाला.
तृणमूलने पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या चार जागा जिंकल्या असून, त्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे अभिषेक मनू संघवी विजयी झाले आहेत. छत्तीसगडमधील एका जागेवर भाजपाच्या सरोज पांडे जिंकल्या, तर जदयू (शरद यादव गट) केरळचे प्रदेशाध्यक्ष एम. पी. वीरेंद्रकुमार हे तेथून निवडून आले. कर्नाटकमध्ये काँग्रेसने राज्यसभेच्या तीन जागा जिंकल्या, तर तेथे भाजपाला एका जागेवर विजय मिळू शकला. उत्तर प्रदेशात मतांची फाटाफूट होण्याची शक्यता असल्याने, तेथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणामधील राज्यसभेच्या
२६ जागांसाठी मतदान झाले. ५८ जागांपैैकी ३३ जागांवरील उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये सात केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

Web Title: Yogis beat UP in UP; 9 Wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.