संपूर्ण अयोध्येत मांस आणि दारुबंदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 12:39 PM2018-11-12T12:39:48+5:302018-11-12T12:46:00+5:30

संपूर्ण अयोध्येमध्ये आता सरकार दारू आणि मांस-मटणावर बंदी आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे.

yogi sarkar in preparation of ban on meat and liquor in entire ayodhya district | संपूर्ण अयोध्येत मांस आणि दारुबंदी?

संपूर्ण अयोध्येत मांस आणि दारुबंदी?

ठळक मुद्देसंपूर्ण अयोध्येमध्ये आता सरकार दारू आणि मांस-मटणावर बंदी आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे. अयोध्येतील आणि अन्य ठिकाणच्या साधू-संतांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे. अयोध्या शहरात आधीपासूनच दारू आणि मांस-मटणावर बंदी होती.

लखनौ - भारतातील अनेक शहरं आणि गावांचं नाव बदलण्याची चर्चा जोरदार रंगलेली असताना उत्तर प्रदेशमधील योगी सरकार एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव बदलून ते प्रयागराज करण्यात आलं. त्यानंतर तर फैजाबादचं नामांतर अयोध्या असं करण्यात आलं आहे. संपूर्ण अयोध्येमध्ये आता सरकार दारू आणि मांस-मटणावर बंदी आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे. अयोध्येतील आणि अन्य ठिकाणच्या साधू-संतांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे. 

वर्षभरात मोदी सरकारनं बदलली 25 शहरं आणि गावांची नावं

अयोध्या शहरात आधीपासूनच दारू आणि मांस-मटणावर बंदी होती. मात्र आता संपूर्ण जिल्ह्याचे नाव फैजाबाद ऐवजी अयोध्या करण्यात आले. त्यामुळेच आता संपूर्ण जिल्ह्यात तशी बंदी आणण्याची मागणी साधू-संतांनी सरकारकडे केली आहे. संतांच्या या मागणीवर उत्तर प्रदेश सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी संपूर्ण जिल्ह्यात दारू आणि मांस-मटणावर बंदी आणावी अशी अयोध्येतील संतांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीवर सरकार विचार करत असून सरकार पूर्णत: सजग असल्याचं म्हटलं आहे. 

Web Title: yogi sarkar in preparation of ban on meat and liquor in entire ayodhya district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.