योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 04:28 AM2018-06-24T04:28:38+5:302018-06-24T04:28:47+5:30

योगा नैराश्याची तीव्रता कमी करण्यास मदत करतो आणि मेंदूतील विशिष्ट रसायनांची पातळी वाढविण्यास मदत करतो, तसेच झोपेचे चक्र, मनाची स्थिती, भूक आणि पचन क्रियेला नियंत्रित करतो

Yoga reduces the intensity of depression | योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता

योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता

Next

नवी दिल्ली : योगा नैराश्याची तीव्रता कमी करण्यास मदत करतो आणि मेंदूतील विशिष्ट रसायनांची पातळी वाढविण्यास मदत करतो, तसेच झोपेचे चक्र, मनाची स्थिती, भूक आणि पचन क्रियेला नियंत्रित करतो, असा निष्कर्ष आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या (एम्स) ताज्या अभ्यासातून समोर आला आहे.
प्रयोगशाळेतील प्रभारी प्रोफेसर रिमा दादा यांनी सांगितले की, या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तणावाला कारणीभूत असणारे हार्मोन कमी करण्यास योगा मदत करतो. त्यामुळे तणाव कमी होतो. योगामुळे मानसिक तणाव कमी होतो. मार्चमध्ये ‘रिस्टोरेटिव्ह न्यूरॉलॉजी अँड न्यूरोसायन्स’जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. याबाबत १२ आठवडे अभ्यास केल्यानंतर हे निष्कर्ष समोर आले आहेत.
नैराश्य ही प्रमुख आरोग्य समस्या आहे. यामुळे लक्षणीय विकृतीसह अन्य आजार उद्भवतात. बालपणात घडलेल्या प्रतिकूल घटनाही नैराश्याला कारणीभूत ठरतात. नैराश्यामुळे शरीराच्या सुरक्षणात्मक नियामक यंत्रणेत अडथळा निर्माण होतो व अनुवंशिक चक्र व पेशींच्या कार्याला हानी पोहचते. शरीरातील तणावाचा प्रतिकार करणाऱ्या यंत्रणेलाच नैराश्य बाधित करते. औषधोपचार व मानसोपचार हे नैराश्यावर गरजेचे आहेत. नैराश्यावर योगाच्या माध्यमातून उपचार केल्यास शारिरीक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते, असा निष्कर्षही समोर आला आहे.

Web Title: Yoga reduces the intensity of depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग