नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवर भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टीका केली होती. यशवंत सिंन्हाच्या या वक्तव्याला आता भाजपमधूनच पाठिंबा मिळू लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे. यशवंत सिन्हा यांचे वक्तव्य हे अत्यंत योग्य असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे. देशाच्या आर्थिक स्थितीचे यशवंत सिन्हा यांनी योग्य वर्णण केले आहे आणि याच्यातून देशाचे कारभारी काही धडा घेतील अशी अपेक्षाही शुत्रघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. 

अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपानेते यशवंत सिन्हा यांनी केली होती.

नरेंद्र मोदींनी पक्षापेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे असे वक्तव्य केले होते. त्याच अर्थाने यशवंत सिन्हा यांच्या वक्तव्याकडे बघितले जाईल अशी अपेक्षाही शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही निर्णयामुळे आधीच टीकेचे धनी झालेले मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले. यशवंत सिन्हांच्या टीकेवर प्रश्नांचा भडीमार झाल्याने राजनाथसिंह आणि रविशंकर प्रसाद यांची कशी भंभेरी उडाली हे काल सगळ्या देशाने पाहिले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.