मोदी सरकारवर यशवंत सिन्हा यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 05:24 AM2018-12-23T05:24:36+5:302018-12-23T05:25:28+5:30

देशातील जीडीपीचे आकडे दिशाभूल करणारे आहेत, रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात आहे आणि नोटाबंदी हा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचा आरोप माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे.

 Yashwant Sinha's attack on the Modi government | मोदी सरकारवर यशवंत सिन्हा यांचा हल्ला

मोदी सरकारवर यशवंत सिन्हा यांचा हल्ला

Next

नवी दिल्ली : देशातील जीडीपीचे आकडे दिशाभूल करणारे आहेत, रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात आहे आणि नोटाबंदी हा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचा आरोप माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे. ‘इंडिया अनमेड : हाऊ द मोदी गव्हर्नमेंट ब्रोक द
इकॉनॉमी’ या आपल्या पुस्तकात सिन्हा यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्यासाठी मोदींकडे चांगली संधी होती.
सिन्हा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांचा स्वयंरोजगाराचा विचार हा बेरोजगारीसारख्या गंभीर मुद्यांपासून विचलित करण्याचा प्रकार आहे. सिन्हा यांनी गत काही वर्षांत सरकारच्या धोरणावर सातत्याने टीका केलेली आहे. त्यांनी एप्रिलमध्ये भाजपा सोडली. अर्थात, पक्षाचे नेते सिन्हा यांचे आरोप सातत्याने फेटाळत आलेले आहेत, तर, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी असेही विचारले होते की, जनतेने मंत्र्यांवर विश्वास ठेवावा की, ज्यांच्याकडे काही काम नाही अशा (सिन्हा) मंडळींवर?
सिन्हा यांनी पुस्तकात मोदी यांनी अर्थव्यवस्थेची घडी कशा प्रकारे विस्कटून टाकली, याविषयी सविस्तर लिहिले आहे. ते म्हणतात, यूपीएनंतरच्या काळातील समस्या दूर होऊ शकल्या असत्या; पण ही संधी सरकारने गमावली.
या पुस्तकात भलेही आपण सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर टीका केली असेल; पण आपण नेहमीच मोदी यांचे टीकाकार नव्हतो याची त्यांनी आठवण करून दिली आहे.

मीही होतो समर्थक

ते म्हणाले की, काही लोक असे म्हणतात की, मला मंत्रीपद न दिल्याने मी टीका करीत आहे; पण वस्तुस्थिती ही आहे की, मी सुरुवातीलाच त्यांचा उत्साह ओळखला होता. भाजपाचे जे नेते मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करावे असे २०१४ मध्ये म्हणत होते, त्यामध्ये मी स्वत:ही होतो.

Web Title:  Yashwant Sinha's attack on the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.