Missing AN-32 Aircraft Update: हवाई दलाच्या बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 03:54 PM2019-06-11T15:54:04+5:302019-06-11T16:11:32+5:30

अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात AN-32 विमानाचे अवशेष सापडल्याचे सांगण्यात येत आहे. 

Wreckage of the missing AN-32 aircraft has been found by Mi-17 helicopters of the Indian Air Force | Missing AN-32 Aircraft Update: हवाई दलाच्या बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले 

Missing AN-32 Aircraft Update: हवाई दलाच्या बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले 

Next

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या AN-32 या विमानाचे अवशेष सापडल्याचे वृत्त आहे. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात AN-32 विमानाचे अवशेष सापडल्याचे सांगण्यात येत आहे. 

हवाई दलाच्या MI-17 या हेलिकॉप्टरला AN-32 विमानाचे अवशेष मिळाले आहेत. MI-17 हेलिकॉप्टर अद्याप घटनास्थळी आहे. सियांग जिल्ह्यातील पयूममध्ये विमानाचे अवशेष आढळले आहेत. समुद्रसपाटीपासून 12 हजार फुटांवर विमानाचे अवशेष सापडल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले. दरम्यान, या विमानामध्ये 13 प्रवासी होते. या प्रवाशांचे नक्की काय झाले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.


गेल्या आठवड्यात AN-32 विमान बेपत्ता झाले. आसामधील जोरहाटमधून उड्डाण केल्यानंतर काही वेळानंतर या विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 8 क्रू मेंमर आणि 5 प्रवासी होते. हे विमान आसामच्या जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशसाठी निघाले होते. 


या विमानाने गेल्या आठवड्यात दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी उड्डाण घेतले. त्यानंतर काही वेळानंतर या विमानाचा संपर्क तुटला. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर भारतीय हवाई दलाने सर्च ऑपरेशन सुरु केले. सर्च ऑपरेशनसाठी सुखोई-30, MI-17 आणि सी-130 स्पेशल ऑपरेशन लढाऊ विमान लाँच करण्यात होती. 



 

Web Title: Wreckage of the missing AN-32 aircraft has been found by Mi-17 helicopters of the Indian Air Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.