वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम : आरोग्य, समृद्धी, शांततेसाठी भारतात या : मोदींचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 04:07 AM2018-01-24T04:07:36+5:302018-01-24T04:08:06+5:30

धनसंपदेसोबतच आरोग्यदायी व परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी तथा शांततेसाठी भारतात या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातीय बड्या कंपन्यांच्या सीईओंना केले. भारत म्हणजे व्यवसायासाठीचे योग्य ठिकाण, असेही मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरून पटवून सांगितले.

 World Economic Forum: Health, prosperity, peace in India: Modi's appeal | वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम : आरोग्य, समृद्धी, शांततेसाठी भारतात या : मोदींचे आवाहन

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम : आरोग्य, समृद्धी, शांततेसाठी भारतात या : मोदींचे आवाहन

Next

दावोस : धनसंपदेसोबतच आरोग्यदायी व परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी तथा शांततेसाठी भारतात या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातीय बड्या कंपन्यांच्या सीईओंना केले. भारत म्हणजे व्यवसायासाठीचे योग्य ठिकाण, असेही मोदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरून पटवून सांगितले.
सध्याच्या काळात माहिती हीच खरी संपत्ती आहे. ज्याच्याकडे माहिती आहे व ती नियंत्रित करण्याची क्षमता आहे, त्याच्या हाती भविष्यात नेतृत्वाची धुरा असेल. जागतिक स्तरावर माहितीच्या प्रवाहामुळे जशा अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, तशीच आव्हानेही उभी ठाकली आहेत. तंत्रज्ञानावर आधारित बदलांमुळे लोकांची विचारसरणी, कार्यशैली, राजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय गटांचे स्वरूप या सर्वांवरच खोल परिणाम झाला आहे.
सब का साथ, सब का विकास-
भारतीय मतदारांनी २०१४ साली लोकसभा निवडणुकांत एकाच पक्षाचे बहुमताचे सरकार सत्तेत येईल, असा कौल दिला. असा बदल देशात ३० वर्षांनी घडला. आम्ही देशातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाचा मुद्दा घेऊन राज्यकारभार करीत आहोत. ‘सबका साथ सबका विकास’ हे आमचे ध्येय आहे. त्यानुसारच आम्ही सर्व धोरणांची आखणी केली आहे.
२१ वर्षांत जीडीपी सहापट वाढला-
दावोसमधील १९९७ व २०१८ मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकांची तुलना करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, १९९७ साली फोरमच्या बैठकीला भारताचे तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा उपस्थित राहिले होते. त्या वेळी भारताचा जीडीपी ४०० अब्ज डॉलर इतका होता. आज त्यात सहापट वाढ झाली आहे.
‘वसुधैव कुटुंबकम्’ असे भारतीय तत्त्वज्ञानात म्हटले आहे. सारे मतभेद मिटविण्यासाठी भारतीय विचार उपयुक्त आहेत. त्यामुळे शांतता, स्थैर्य, विकास यांच्यातील अडसरही दूर करता येतील, असेही मोदी यांनी म्हटले. लोकशाही व्यवस्था व विविधता यांचा भारतीयांना अभिमान वाटतो. भारतीय समाजात विविध धर्म, संस्कृती, भाषा एकत्र नांदतात. अशा भारतीय समाजासाठी लोकशाही ही जीवनशैली आहे.

Web Title:  World Economic Forum: Health, prosperity, peace in India: Modi's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.