गुजरात निवडणूक: पाहता क्षणी वाटते मॉडेल, पण आहे कॉंग्रेसचा यंग फेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 12:18 PM2017-11-28T12:18:52+5:302017-11-28T12:40:17+5:30

गुजरातमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आणखी एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Women and youth are my strength in Gujarat elections - Shweta Bramabhatta | गुजरात निवडणूक: पाहता क्षणी वाटते मॉडेल, पण आहे कॉंग्रेसचा यंग फेस

गुजरात निवडणूक: पाहता क्षणी वाटते मॉडेल, पण आहे कॉंग्रेसचा यंग फेस

Next
ठळक मुद्दे. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्वेताला तिकिट दिले म्हणून आंदोलनही केले.वडिलांच्या प्रेरणेमुळे मी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला असे श्वेताना सांगितले.

अहमदाबाद - गुजरातमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आणखी एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुजरातमध्ये श्वेता ब्रम्हभट्ट या नावाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. श्वेताचा फोटो किंवा तिला पाहिल्यानंतर ती मॉडेल असल्याचा अनेकांचा समज होतो. पण श्वेता राजकारणात सक्रीय असून यंदाच्या गुजरात निवडणुकीत काँग्रेसने तिला मणीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 

उच्चशिक्षित असलेल्या श्वेताने इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले आहे. रविवारी रात्री श्वेताला मणीनगरमधून उमेदवारी जाहीर झाली. तिच्या उमेदवारीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्वेताला तिकिट दिले म्हणून आंदोलनही केले. येत्या 14 डिसेंबरला मणीनगरमध्ये मतदान होणार असून तिच्यासमोर भाजपाच्या सुरेश पटेल यांचे आव्हान आहे. श्वेताचे वडिल नरेंद्र ब्रम्हभट्टही काँग्रेसमध्ये सक्रीय असून त्यांनी 2000 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. 

वडिलांच्या प्रेरणेमुळे मी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला असे श्वेताना सांगितले. श्वेतला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायचे होते. बीबीएमध्ये पदवी घेतल्यानंतर तिने लंडनच्या  विद्यापीठातून मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर एचएसबीसी आणि डाराशॉमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले. त्यानंतर समाजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्र असे दोन पर्याय समोर असताना तिने समाजकारणाची निवड केली. 2012 मध्ये श्वेताला विधानसभा निवडणूक लढवायची संधी होती पण करीयर महत्वाचे असल्याने तिने ऑफर नाकारली. 

अनेक दशकांपासून मणीनगर हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे इथे निवडणूक कशी जिंकणार या प्रश्नावर श्वेताना सांगितले कि, माझ्या मतदारसंघातील 75 टक्के मतदार चाळीशीच्या आतील आणि महिला आहेत. महिला आणि तरुणाईला सक्षम करण्याला माझे पहिले प्राधान्य असेल. निवडणुकीत हेच दोन घटक माझे मुख्य बलस्थान आहेत असे श्वेताना सांगितले. लोक नेत्यांना आदर्श मानतात त्यामुळे आम्हाला काही चांगली उदहारण समोर ठेवायची आहेत. मतभेदांनाही राजकारणात वाव असला पाहिजे. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विचारधारा आणि लोकशाही या आधारावर मी काँग्रेसची निवड केली असे श्वेताना सांगितले. 
 

Web Title: Women and youth are my strength in Gujarat elections - Shweta Bramabhatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.