कर्जबुडव्या विजय माल्ल्या तिस-यांदा विवाहबंधनात अडकणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 09:04 AM2018-03-29T09:04:03+5:302018-03-29T09:07:27+5:30

बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून देशाबाहेर पलायन केलेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्ल्या आता  तिस-यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. विजय माल्ल्या त्याची गर्लफ्रेंड पिंकी लालवानीसोबत लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 

Will Vijay Mallya get involved in marriages for the third time? | कर्जबुडव्या विजय माल्ल्या तिस-यांदा विवाहबंधनात अडकणार ?

कर्जबुडव्या विजय माल्ल्या तिस-यांदा विवाहबंधनात अडकणार ?

Next
ठळक मुद्देविजय माल्ल्या आता  तिस-यांदा विवाहबंधनात अडकणार गर्लफ्रेंड पिंकी लालवानीसोबत लग्नाच्या बोहल्यावर चढणारपिंकी लालवानी एअरहोस्टेस म्हणून कार्यरत होती.

मुंबई : बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून देशाबाहेर पलायन केलेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्ल्या आता  तिस-यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. विजय माल्ल्या त्याची गर्लफ्रेंड पिंकी लालवानीसोबत लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 
मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून विजय माल्ल्या आणि पिंकी लालवानी एकत्र राहत आहेत. त्या दोघांची भेट 2011 मध्ये झाली होती. विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्समध्ये पिंकी लालवानी एअरहोस्टेस म्हणून कार्यरत होती. तेव्हापासून त्या दोघांची जवळीक वाढली होती. मात्र, विजय माल्ल्या देशाबाहेर पळून गेल्यानंतर लंडनला त्याच्यासोबत पिंकी लालवानी सतत दिसायची. तसेच, दोघे काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा होत होती. 
विजय माल्ल्याचे पहिले लग्न 1986 मध्ये झाले होते. त्यावेळी त्याने समीरा तयाबजीसोबत केले होते. ती सुद्धा एअरहोस्टेस होती. मात्र, या दोघांच लग्न जास्त काळ टिकलं नाही. विजय माल्ल्याने समीरा तयाबजीशी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने 1993 मध्ये रेखा माल्ल्याशी दुसरे लग्न केले.  रेखा अजूनही कायदेशीररित्या त्याची पत्नी आहे.

विजय माल्ल्याचे पलायन ... 
विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. विजय माल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय माल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाला होता.

Web Title: Will Vijay Mallya get involved in marriages for the third time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.