मोदींना पाठिंबा देईन म्हणणाऱ्या केजरीवालांना राहुल का फोन करतील? काँग्रेसचे आपला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 03:30 PM2018-08-09T15:30:41+5:302018-08-09T15:31:31+5:30

राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या टीकेला काँग्रेसने चोख प्रत्त्युतर दिले आहे.

Will Rahul make phone call to Kejriwal ? Congress gives befitting reply | मोदींना पाठिंबा देईन म्हणणाऱ्या केजरीवालांना राहुल का फोन करतील? काँग्रेसचे आपला प्रत्युत्तर

मोदींना पाठिंबा देईन म्हणणाऱ्या केजरीवालांना राहुल का फोन करतील? काँग्रेसचे आपला प्रत्युत्तर

नवी दिली- राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जनता दल युनायटेडचे हरिवंश नारायण सिंह विजयी झाले आहेत. आपल्या उमेदवारास विजय मिळवून देण्यात रालोआ यशस्वी झाले असले तरी विरोधकांमध्ये मात्र फूट पडल्याचे आता दिसून येत आहे.
राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारू शकतात तर आमच्या नेत्यांना म्हणजे केजरीवाल यांना पाठिंब्यासाठी फोन का करु शकत नाहीत असा प्रश्न आपचे खासदार संजय सिंह यांनी विचारला होता. आता काँग्रेसने आपला प्रत्युत्तर दिले आहे.




आप म्हणतं राजकारण इगोवर चालू शकत नाही. हे अगदी बरोबर आहे. म्हणूनच केजरीवाल यांनी मतदानात भाग घेणं नाकारलं आणि भाजपाला मदत केली. अशा शब्दांमध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्वीट केले आहे.



दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिल्यास 2019 साली भाजपासाठी प्रतार करु असे विधान केजरीवाल यांनी केला होता. त्यावरुनही काँग्रेसने केजरीवालांवर टीका केली आहे. मोदींसाठी प्रचार करु म्हणणाऱ्या पक्षाच्या नेत्याला आम्ही फोन का करावा? राजकारण ही विचारप्रवाहांची लढाई आहे. ते संधीसाधू लोकांसाठी नाही अशा शब्दांमध्ये मुखर्जी यांनी आपला फटकारले आहे.

Web Title: Will Rahul make phone call to Kejriwal ? Congress gives befitting reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.