पत्नी केवळ हसून बोलली, पतीनं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 06:43 PM2019-01-16T18:43:17+5:302019-01-16T20:43:54+5:30

एका रहिवाशानं भाजीवाल्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भाजीवाल्यासोबत आरोपीची पत्नी केवळ हसून बोलली म्हणून संतापाच्या भरात त्यानं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवले.

wife laughed husband cut off seller neck rajsamand rajasthan | पत्नी केवळ हसून बोलली, पतीनं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवलं

पत्नी केवळ हसून बोलली, पतीनं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवलं

googlenewsNext
ठळक मुद्देसंशयी स्वभावाच्या पतीकडून भाजीविक्रेत्याची हत्या आरोपीनं भाजीविक्रेत्याचं मुंडकंच छाटलं

जयपूर - राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यामध्ये एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील एका रहिवाशानं भाजीवाल्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भाजीवाल्यासोबत आरोपीची पत्नी केवळ हसून बोलली म्हणून संतापाच्या भरात त्यानं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवले. लक्ष्मण सिंह (48 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या भाजीवाल्याचं नाव आहे. तर नैना सिंह (27 वर्ष) असे आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस घटनास्थळावरुन अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नैना सिंहनं कालादेह परिसरात राहणाऱ्या लक्ष्मण सिंहची हत्या केली. लक्ष्मण सिंह हा भाजीविक्रेता होता. घटना घडल्याच्या दिवशी लक्ष्मण सिंह आरोपीच्या घराबाहेर उभे राहून भाजी विकत घेण्यासाठी आवाज देऊ लागला. तेव्हा आरोपी नैना घराबाहेर आला आणि त्यानं लक्ष्मणच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करत त्याचे डोकं उडवलं. पहिला वार त्याच्या कानाजवळ केला आणि दुसरा वार थेट त्याच्या गळ्यावर करत त्याचे डोकं धडापासून वेगळं केले. 

शंकेखोर स्वभावाचा होता आरोपी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नैना सिंहचा स्वभाव फार संशयी होता. भाजीविक्रेत्यासोबत आपली पत्नी हसून बोलल्याचे त्याला अजिबात पटले नाही. याच रागाच्या भरात त्यानं भाजीवाल्याचं मुडकंच उडवलं. शिवाय, त्याला स्वतःच्या घरातही कोणी आले-गेलेले आवडायचे नाही.  दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 

Web Title: wife laughed husband cut off seller neck rajsamand rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.