विचारही केला नव्हता, आम्ही दोघंही करोडपती होऊः 'उपमुख्यमंत्री' सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:59 PM2018-12-14T17:59:39+5:302018-12-14T18:00:21+5:30

आम्ही याच खोलीत बसलो होतो. कोणाला माहीत होते की, आम्ही दोघेही करोडपती होऊ, असे सांगत सचिन पायलट यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यातील जनतेचे आभार मानले. सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. 

Who would have known that instead of one there will be two crorepatis - Sachin Pilot  | विचारही केला नव्हता, आम्ही दोघंही करोडपती होऊः 'उपमुख्यमंत्री' सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया

विचारही केला नव्हता, आम्ही दोघंही करोडपती होऊः 'उपमुख्यमंत्री' सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया

googlenewsNext

नवी दिली : आम्ही याच खोलीत बसलो होतो. कोणाला माहीत होते की, आम्ही दोघेही करोडपती होऊ, असे सांगत सचिन पायलट यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यातील जनतेचे आभार मानले. सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. 

दिल्लीतील काँग्रेस पक्ष मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राजस्थानातील निरीक्षक के. सी. वेणुगोपाल यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची अधिकृत घोषणा केली. यावेळी अशोक गहलोत यांच्याकडे पुन्हा एकदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर सचिन पायलट यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 


यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सचिन पायलट म्हणाले, '' आम्ही याच खोलीत बसलो होतो. कोणाला माहीत होते की, आम्ही दोघेही करोडपती होऊ. राहुल गांधी आणि राजस्थानमधील जनतेचे मी आभार मानतो. तीन राज्यातील परिणाम देशाला आनंद देणारे आहेत. राजस्थानच्या जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. वसुंधरा राजे यांच्याविरुद्ध माझी आणि अशोक गहलोत यांची जादू चालली आहे. आम्ही आधीच राज्यपालांची भेट घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी मी देश, राज्य आणि लोकांसाठी काम केले आहे. आम्ही एक चांगले सरकार देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तसेच, जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांच पालन करणार आहोत''.






Web Title: Who would have known that instead of one there will be two crorepatis - Sachin Pilot 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.