भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे कोणती? 200 रेल्वेगाड्यांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 04:06 PM2018-08-27T16:06:01+5:302018-08-27T16:18:47+5:30

प्रिमियर ट्रेनच्या 72 जोड्यांबरोबर इतर 128 गाड्यांचीही तपासणी होणार आहे. यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, संपर्क क्रांती आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे.

Which is India’s cleanest train? Indian Railways to rank 200 trains on basis of cleanliness | भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे कोणती? 200 रेल्वेगाड्यांची होणार तपासणी

भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे कोणती? 200 रेल्वेगाड्यांची होणार तपासणी

Next

नवी दिल्ली- भारतीय रेल्वे अधिकाधिक स्वच्छ होण्यासाठी आता 200 रेल्वेगाड्यांची तपासणी केली जाणार आहे. शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, दुरांतो गाड्यांचा यामध्ये समावेश असेल. या सर्वेक्षणात शौचालये, स्वच्छतेची पातळी, कापडाची गुणवत्ता, स्वच्छतेसाठी वापरले जाणारी रसायने यांचीही पाहणी केली जाणार आहे. यापुर्वी रेल्वे स्थानकांचा पाहणी करुन झाली आहे. आता रेल्वेगाड्यांची तपासणी करुन स्वच्छतेबाबत काळजी घेतली जाणार आहे.

प्रिमियर ट्रेनच्या 72 जोड्यांबरोबर इतर 128 गाड्यांचीही तपासणी होणार आहे. यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, संपर्क क्रांती आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. प्रत्येक मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांमधील 60 प्रवाशांकडून स्वच्छतेबाबतचे मत घेतले जाईल तर प्रिमियर गाडीतील 100 लोकांकडून माहिती घेतली जाईल.
प्रवाशांकडून माहिती घेतल्यावरही ट्रेनमधील स्वच्छतेची व्यवस्था काटेकोरपणे तपासली जाईल. तसेच ऑन बोर्ड हाऊसकिपिंग सर्विस म्हणजे रेल्वेमध्ये स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या लोकांच्या कामाची गुणवत्ताही तपासली जाईल.
रेल्वेचा वाढणार वेग, अॅल्युमिनियम कोचचे होणार रायबरेलीत उत्पादन
 भारतामध्ये प्रथमच रायबरेलीतील मॉडर्न कोच फॅक्टरी येथे वजनाने अत्यंत हलके आणि टिकाऊ असे रेल्वे कोच बनवले जाणार आहेत. हे कोच अॅल्युमिनियमपासून तयार केले जाणार आहेत. पुढील आर्थिक वर्षामध्ये हे डबे भारतामध्ये वापरले जाण्याची शक्यता आहे.

पोलादी डब्यांच्या तुलनेत हे कोच वजनाने हलके असून कमी ऊर्जेच्या मदतीने खेचले जाऊ शकताच यामुळे रेल्वेची गतीही वाढवली जाऊ शकते. रेल्वेच्या आधुनिकीकरण मोहिमेत या नव्या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. दिल्ली मेट्रोसाठीही अॅल्युमिनियम कोचेसचा वापर केला गेला आहे. मॉडर्न कोच फॅक्टरीने या अॅल्युमिनियम कोचचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दिला असून त्यांच्या मंजुरीनंतर उत्पादन सुरु होईल. यासाठी जपान किंवा युरोपातून तंत्रज्ञान आणले जाईल. त्यासाठी भारतीय तज्ज्ञांचे शिष्टमंडळ या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये युरोपमध्ये भेट देऊन आले आहे. गेल्या 15 वर्षांपासून युरोपमधील काही देश आणि जपान या डब्यांचा वापर करत आहेत.

मॉडर्न कोच फॅक्टरीने वर्षाला 250 कोच बनवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर रेल्वे बोर्डाने वर्षाला 500 कोच बनवण्यासाठी प्रकल्प अहवाल बनवण्याचे सुचवले आहे. सध्या भारताकडे त्याचे तंत्रज्ञान नसल्यामुळे सुरुवातील या कोचची किंमत अधिक असेल.

Web Title: Which is India’s cleanest train? Indian Railways to rank 200 trains on basis of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.