...जेव्हा काही क्षणांसाठी सरन्यायाधीश बनतात राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 01:47 PM2017-07-25T13:47:27+5:302017-07-25T17:48:58+5:30

देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. देशाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. केहर यांनी

... when the President becomes the Chief Justice for a few moments | ...जेव्हा काही क्षणांसाठी सरन्यायाधीश बनतात राष्ट्रपती

...जेव्हा काही क्षणांसाठी सरन्यायाधीश बनतात राष्ट्रपती

googlenewsNext
>नवी दिल्ली, दि. 25 - देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. देशाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. केहर यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी शपथ दिली. त्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती आपल्या आसनांची अदलाबदल केली. 
आसनांची अदलाबदल करण्याच्या काही क्षणांसाठी देशाच्या सरन्यायाधिशांना राष्ट्रपती समजलं जातं. त्यानुसार नियमाप्रमाणं आसन बदल होताना काही मिनिटांसाठी न्या. केहर यंना राष्ट्रपती समजण्यात आलं.
 
शपथविधी सोहळ्यात देशाचे जवळपास सर्वच दिग्गज नेते,राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.  राष्ट्रपतिपदाची शपथ घेण्यापूर्वी कोविंद राजघाट येथे पोहोचले, तेथे यांनी त्यांच्या पूर्वसुरींप्रमाणे शपथविधीच्या आधी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर यांनी राष्ट्रपती भवनाच्या लायब्ररीमध्ये मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. 
शपथविधीचा छोटेखानी औपचारिक सोहळा संसद भवनाच्या मध्यवर्ती दालनात झाला. सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहार कोविंद यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती हे प्रजासत्ताकाचे राष्ट्रप्रमुख असल्याने त्यांच्या पदग्रहणास उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व केंद्रीय मंत्री, तिन्ही सेनादलांचे प्रमुख, सर्व घटकराज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि शंभरहून अधिक देशांचे भारतातील राजदूत व उच्चायुक्त उपस्थित होते.
 रिवाजानुसार राष्ट्रपतींचे लष्करी सचिव कोविंद यांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणापर्यंत घेऊन गेले. तेथे मावळते राष्ट्रपती मुखर्जी यांनी उत्तराधिकाऱ्यांचं स्वागत केलं. त्यानंतर माजी आणि भावी असे दोन्ही राष्ट्रपती एकाच मोटारीत बसले व मोटारींचा ताफा दोघांनाही संसद भवनात घेऊन आला.
संसद भवनाच्या प्रवेशद्वारी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन व राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी कोविंद यांचे स्वागत करून शपथविधीसाठी त्यांना केंद्रीय सभागृहात घेऊन गेले.  पदग्रहणानंतर राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलाची तुकडी नव्या राष्ट्रप्रमुखांच्या मोटारीच्या अग्रभागी राहून त्यांना राष्ट्रपती भवनापर्यंत नेण्यात आलं. येतानाही कोविंद व मुखर्जी एकाच मोटारीने परत येतील, मात्र यावेळी त्यांच्या जागा बदललेल्या असतील.
राष्ट्रपती भवनात आल्यावर मुखर्जी कोविंद यांना सोबत घेऊन ‘ग्रहप्रवेश’ करतील व नव्या राष्ट्रपतींना भवनाची सैर करत त्यांना राष्ट्रपतींचे कार्यालय असलेल्या अभ्यासिक दालनात घेऊन येतील. तेथे मुखर्जी यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यास राष्ट्रपतींच्या आसनावर आदरपूर्वक बसविले की नव्या राष्ट्रपतींच्या पदग्रहणाचा औपचारिक समारोप होईल. निवृत्तीनंतर प्रणव मुखर्जी यांचे वास्तव्य १०, राजाजी मार्ग या बंगल्यात असेल. पदग्रहणानंतर कोविंद मुखर्जी यांना त्यांच्या नव्या घरी सोडून परत राष्ट्रपती भवनात येतील.
ज्योतिषांनी ठरविला रामनाथ कोविंद यांच्या शपथविधीचा मुहूर्त- 
राजकारण्यांच्या जीवनात ज्योतिषांची भूमिका महत्वाची असते हे तसे सर्वज्ञात आहे. राष्ट्रपतींच्या सोहळ्यासाठी २५ जुलै रोजी हा दिवस नक्की असतो. पण यंदा ज्योतिषाच्या सांगण्यावरून राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मागच्या दोन दशकात शपथविधी सकाळी १० ते १२ च्या दरम्यानच झालेला आहे. पण, यंदा नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १२.१५ वाजता शपथ घेण्याचे ठरविले आहे. शपथविधी सोहळा मंगळवारी सकाळी १०.१५ वाजता होणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. पण, कदाचित ज्योतिषांच्या सल्ल्यावरुन शपथविधीची वेळ बदलण्यात आली आहे. अभिजित नक्षत्र १२.१४ नंतर सुरू होते. सर्वात शुभ वेळ १२.१५ ची असेल. भाजपचे ज्येष्ठ खासदार प्रभात झा यांच्या म्हणण्यानुसार, ही सर्वात शुभ वेळ आहे. भगवान राम अभिजित नक्षत्रावर जन्मले होते.

Web Title: ... when the President becomes the Chief Justice for a few moments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.