शेतकरी मरत होते तेव्हा मोदी योगासने करा सांगत होते- राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:20 AM2018-03-19T04:20:51+5:302018-03-19T04:20:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर न भूतो असा हल्ला करून काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी रविवारी पक्षाच्या ८४ व्या महाधिवेशनाचा घणाघाती समारोप केला.

When farmers were dying, Modi was telling Yogas- Rahul Gandhi | शेतकरी मरत होते तेव्हा मोदी योगासने करा सांगत होते- राहुल गांधी

शेतकरी मरत होते तेव्हा मोदी योगासने करा सांगत होते- राहुल गांधी

Next

- शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर न भूतो असा हल्ला करून काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी रविवारी पक्षाच्या ८४ व्या महाधिवेशनाचा घणाघाती समारोप केला. शेतकरी मरत होते तेव्हा मोदी सांगत होते की योगासने करा, अशी टीका त्यांनी केली.
नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मोदी खोटी आश्वासने देऊन मुख्य मुद्द्यांवरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहेत. मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण केलेली नाहीत. लोकांनी विश्वास ठेवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान केले. सत्ता हाती येताच त्यांच्या गाडीत एका बाजूला ललित मोदी व दुसºया बाजूला नीरव मोदी असे चित्र कार्यकर्त्यांना दिसले. मात्र काँग्रेस पक्षामध्ये असे कधीही होणार नाही.
असत्य हिच भाजपाची ओळख असल्याने लोक त्यांच्याकडे त्याचदृष्टीने पाहतात. खुनाचा आरोप असलेली व्यक्ती फक्त भाजपामध्येच अध्यक्ष असू शकते. भाजपाचा आवाज हा फक्त एका संघटनेचा आहे तर काँग्रेसचा आवाज हा संपूर्ण राष्ट्राचा आवाज आहे.
मोदी शब्दाचा ‘अर्थ’ राहुल गांधी यांनी समजावून सांगितला. ते म्हणाले, मोदी हा शब्द मर्जीतले उद्योगपती व सरकार यांच्यातील साटेलोट्याचा प्रतिक बनला आहे. परस्पर सहकार्याने राबविण्यात येणाºया भांडवलशाहीचा हा नमुना आहे. मुसलमानांना मोदी सांगतात की, तुम्ही या देशातलेच नाही. जो मुसलमान कधी पाकिस्तानात गेलाच नाही, ज्याने नेहमी भारताचेच गुणगान गायले त्यांना सांगितले जाते आहे की, तुम्ही या देशाचे नागरिकच नाही. महिलांच्या पोशाखाबद्दलही टीका केली जाते. त्यांनी योग्य ढंगाचे कपडे घालावे,असा सल्ला दिला जातो. हे विचार काँग्रेसला कधीही मान्य होणार नाहीत.
राहुल गांधी यांनी मंदिरात दर्शनाचा किस्साही सांगितला. ते म्हणाले, मी मंदिरात गेलो. तेथील पुजाºयाला विचारले की, तुम्ही नेमके कोणते विधी करत आहात? त्यावर त्याने सांगितले की, तुम्ही डोळे बंद करा म्हणजे देवाचे दर्शन होईल. मी काश्मिरी आहे पण हे कोणाला सांगू नका. तुम्ही ज्या ज्या देवळात जाल तिथे परमेश्वराचे नक्की दर्शन होईल. राहुल गांधी म्हणाले की, याप्रमाणे मी दुसºया मंदिरात गेलो तर तिथेही पुजारी होते. त्यांनाही मी त्या विधींबद्दल प्रश्न विचारला, पण या पुजाºयाने दिलेले उत्तर निराळे होते. या दुसºया पुजाºयाने मला सवाल केला की, मंदिराच्या छताकडे पाहा, तुम्हाला तिथे काय दिसते? मी त्यांना सांगितले की, छताला सिमेंट आहे. तेव्हा पुजारी म्हणाला ‘तुम्ही पंतप्रधान नक्की बनाल. जेव्हा पंतप्रधान व्हाल तेव्हा या छताला सोन्याने मढवा.
राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस व भाजपाच्या विचारसरणीत हाच नेमका फरक आहे, पहिल्या पुजाºयाने सत्य सांगितले व दुसºया पुजाºयाने भाजपासारखे उत्तर दिले.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसजनांनी निडर बनून संघर्षासाठी सज्ज व्हायला हवे. काँग्रेसची विचारसरणी इतकी ठोस आहे की, सत्य बोलण्यापासून कोणीही राखू शकत नाही. मोदी यांचे सरकार भ्रष्ट आहे. देशातील जनतेला काँग्रेसकडून अधिक अपेक्षा आहेत कारण आम्ही उच्च नीतीमूल्यांची नेहमीच पाठराखण करतो. भाजपासारखे आम्ही वागत नाही.
ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असा दावा मोदी सरकार नेहमी करत असते. परंतु देशातील लाखो लोक बेकार आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दुसºया बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी नोटबंदी तर कधी जीएसटीची ढाल पुढे करुन गंभीर मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहेत. जंगलावर तुमचा अधिकार नाही असे आदिवासींना सांगितले जाते. शेतकºयांना सांगितले जाते की कष्ट करा व दुसºया बाजूला नीरव मोदीला बँक घोटाळ््यातून सुटण्यासाठी मदत केली जाते. एका मोदीने दुसºया मोदीला तीस हजार कोटी रुपये दिले. कारण मोदी निवडणुकांमध्ये आपली छबी उजळवू शकतील व त्याचा निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना उपयोग होईल.
भाजपाने देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. आजवर लोक न्यायालयाकडे दाद मागायचे. आता सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना न्याय मिळविण्यासाठी जनतेला साद घालावी लागली. या मागचे महत्वाचे कारण असे की, संघ देशातील सर्व संस्था उद््ध्वस्त करू पाहात आहे. संघाला या सगळ््या संस्थांना अंकित करायचे आहे. काँग्रेसने देशातील सर्व यंत्रणांचा नेहमीच आदर राखला आहे व त्यांना अधिक मजबूत केले आहे,असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, सन २०१९ मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल तेव्हा शेतकºयांना हरसंभव मदत देण्याची व्यवस्था करेल. त्यांच्या हिताची जपणूक करणे हा काँग्रेसचा अग्रक्रम असेल. शेतमालाला रास्त किंमत मिळावी यासाठी जिल्ह्यांमध्ये फूडपार्कचे जाळे उभे केले जाईल. युवकांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आयआयटी व आयआयएम सारख्या दर्जेदार शिक्षणसंस्था स्थापन केल्या जातील. एवढेच नव्हे आज उच्च शिक्षणासाठी बँका तरुणांना कर्ज देत नाहीत. परंतु काँग्रेस सत्तेत आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात युवकांना शिक्षणास कर्ज मिळेल याची खात्री केली जाईल. उत्तम शिक्षण हा प्रत्येक युवकाचा हक्क आहे. उच्च शिक्षण देशाच्या कानाकोपºयात पोहोचविण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. देशातील प्रतिष्ठित संस्थांना संपवून टाकण्याचा संघाने चंग बांधला आहे. काँग्रेस मात्र त्या संस्थांना बळकटी देण्यास कटिबद्ध आहे. मोदी सरकारची वाढती दहशत व माध्यमांवरील त्याच्या प्रभावाचा उल्लेखही राहुल गांधी यांनी आवर्जून केला. ते म्हणाले की, भाजपाने संपूर्ण देशात भीताचे वातावरण निर्णाण केले आहे. माध्यमांमधील लोकही त्यांना घाबरून आहेत. माध्यमे काँग्रेसच्यसा विरोधात लिखाण करीत आहेत हे दिसत असूनही काँग्रेस मात्र त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील.
सन २०१९ मध्ये आमच्या विचारसरणीचा विजय होणार हे नक्की आहे. त्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पोटनिवडणुकांमध्ये भाजपा एकापाठोपाठ एका जागेवर पराभूत होत आहे. याचा परिणाम म्हणून पंतप्रधान मोदींचा सूट गायब झाला आहे व त्यांच्या चेहºयावरची चमकही गायब झाली आहे.
काँग्रेस हा सिंहांचा व गांधींचा पक्ष असल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी कोणतीही भीती न बाळगता संघर्ष सुरु ठेवावा, असे आवाहन त्यानी केले. सोबत त्यांनी असेही बजावले की, आपसातील मतभेद अडसर ठरू देऊ नका व तसे दिसून आले तर ते खपवून घेतले जाणार नाही. भारताची चीनशी तुलना करून राहुल म्हणाले की, जेथे प्रत्येक २४ तासांत ३० हजार रोजगार दिले जातात व जेथे प्रत्येक जिल्ह्यातकाही ना काही उत्पादन होते अशा चीनशी आपला मुकाबला आहे. जगात कुठेही गेलात तरी ‘मेड इन चायना’च्या मालाने बाजारपेठा भरलेल्या दिसतात. काँग्रेसला वाटते की, बाजारात ‘मेड इन इंडिया’चा माल दिसावा व जिल्ह्याजिल्ह्यात कारखानदारी उभी राहावी. आज जगात अमेरिका व चीनचे नाव घेतले जाते. परंतु जगात भारताचे असे वेगळे स्थान निर्माण करण्याचे काँग्रेसचे स्वप्न आहे. अमेरिका व चीनहून भारताकडे उत्तम दृष्टिकोन आहे हे जगाला दाखवायचे आहे.
>माझ्या नेतृत्वातील काँग्रेस सर्वसामान्य कार्यकर्त्यांची
वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्ष संकेत करत त्यांनी स्पष्ट केले की, माझ्या नेतृत्वाखालील काँग्रेस ही गाव आणि ब्लॉक पातळीवर काम करणाºया कार्यकर्त्यांची असेल जशी ती पंडित नेहरु व बाबू जगजीवनराम यांच्या काळात होती. या बदलासाठी मला दोन भिंती पाडून टाकाव्या लागतील. एक भिंत नेते व कार्यकर्त्यांमधील आहे. दुसरी भिंत तरुण पिढी आणि राजकीय व्यवस्था यांच्यातील आहे. यासाठी संघटनेत आमुलाग्र बदल करावे लागतील. हजर असलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या समक्ष ते म्हणाले की, काहीजणांना हे आवडणार नाही, याची मला कल्पना आहे. पण देश बदलण्याची खरी ताकद मागे बसणाºयांमध्येच आहे, असा माझा विश्वास आहे. सभास्थानी कार्यकर्ते मागे व नेतेमंडळी पुढे बसलेली होती त्यामुळे त्यांचा संकेत थेट कार्यकर्त्यांकडे होता, हे स्पष्ट होते. आपल्या प्राथमिकता स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, पक्ष संघटनेतील भिंती पाडून टाकणे हे माझे पहिले काम असेल. परंतु वरिष्ठ नेत्यांचा मान ठेवूनच ही भिंत पाडली जाईल. राहुल गांधी यांनी हे सांगताच संपूर्ण स्टेडियम टाळ््यांच्या कडकडाटाने व ‘राहुल गांधी जिंदाबाद’च्या घोषणांनी दुमदुमून गेले.
>निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी
राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना हा विश्वास दिला की, जे कार्यकर्ता दहा ते पंधरा वर्षांपासून पक्षासाठी कार्य करीत आहेत त्यांनाच निवडणुकीत उमेदवारी देण्यात प्राधान्य दिले जाईल. गुजरातच्या अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग केला व त्याचे निकाल सर्वांसमोर आहेत. गुजरातमध्ये निवडणुकीनंतर काँग्रेसच्या आमदारांची संख्या ६१ वरून ८० पर्यंत जाऊन पोहोचली. कारण तेथील स्थानिक कार्यकर्त्यांवर आम्ही विश्वास ठेवला. युवाशक्तीच्या

Web Title: When farmers were dying, Modi was telling Yogas- Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.