चिथावणीजनक मजकूरावर पायबंद; सरकारसमोर झुकत व्हॉटस्अ‍ॅपने केली तक्रार अधिकाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 03:49 AM2018-09-24T03:49:44+5:302018-09-24T03:50:01+5:30

मेसेजिंग सेवादात्या व्हॉटस्अ‍ॅपने अखेर केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान आणि केंद्र सरकारसमोर झुकत भारतासाठी तक्रार अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.

WhatsApp made appointment of Grievance Officer | चिथावणीजनक मजकूरावर पायबंद; सरकारसमोर झुकत व्हॉटस्अ‍ॅपने केली तक्रार अधिकाऱ्यांची नियुक्ती

चिथावणीजनक मजकूरावर पायबंद; सरकारसमोर झुकत व्हॉटस्अ‍ॅपने केली तक्रार अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next

- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - मेसेजिंग सेवादात्या व्हॉटस्अ‍ॅपने अखेर केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान आणि केंद्र सरकारसमोर झुकत भारतासाठी तक्रार अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.
लोकांना चिथावणी किंवा द्वेष पसरविणारे संदेश तसेच खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्याची जबाबदारी या अधिकाºयावर असेल. खोट्या बातम्यांच्या (फेक न्यूज) प्रसारासाठी व्हॉटस्अ‍ॅपचा सर्वाधिक वापर होत असल्याकडे लक्ष वेधत केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉटस्अ‍ॅपवर दबाव वाढविला होता. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी या कंपनीने भारतात अधिकारी नियुक्त करावा, असा मुद्दा त्यांनी अलीकडेच व्हॉटस्अ‍ॅपचे सीईओ क्रिस डेनियल यांच्यासोबत झालेल्या चर्चेत उपस्थित केला होता. अधिकाºयाच्या नियुक्तीत विलंब होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. डेनियल यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत अधिकाºयांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते.
कोमल लाहिरी यांच्याकडे जबाबदारी
गेल्या मार्चमध्ये फेसबुकमधून व्हॉटस्अ‍ॅपमध्ये दाखल झालेल्या कोमल लाहिरी या भारतात तक्रार अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार असून, त्या ग्लोबल कस्टमर आॅपरेशन्स आणि लोकलायजेशन वरिष्ठ संचालक म्हणून काम पाहतील. फेसबुकमध्ये त्यांच्याकडे कम्युनिटी सपोर्ट सोशल नेटवर्किंगची जबाबदारी होती. फेसबुकच्या इन्स्टाग्राम कंपनीसाठीही त्या काम करीत होत्या. त्या सध्या कॅलिफोर्नियात व्हॉटस्अ‍ॅपचे मुख्यालय असलेल्या मेनलो पार्कमध्ये कार्यरत असून, लवकरच त्या भारतात तक्रार अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारतील.

ई-मेलद्वारे करता येणार तक्रार...

व्हॉटस्अ‍ॅप युझरला कोणत्याही प्रकारची तक्रार करायची झाल्यास कोमल लाहिरी यांना ई-मेल पाठवता येईल. युझर अकाऊंट आणि संबंधित सेवा-शर्तींबाबतही संपर्क करता येईल. व्हॉटस्अ‍ॅपने वारंवार विचारल्या जाणाºया प्रश्नांच्या (फ्रीक्वेन्ट आस्क क्वेश्चन) विभागात तक्रार अधिकाºयांच्या नियुक्तीबाबत माहिती जारी केली आहे.
ट्रेसिंगच्या मुद्यावर ओढाताण सुरूच...
कोणताही संदेश कुठून जारी झाला, याचा छडा त्याचवेळी लावणारी (रियल टाइम ट्रॅक) यंत्रणा लागू करण्याबाबत सरकारने केलेल्या मागणीची पूर्तता व्हॉटस्अ‍ॅपला करता आलेली नाही. ट्रेसिंगसंबंधी सध्याचे नियम आणि धोरणानुसार ही कंपनी त्याला मुभा देऊ शकत नाही. संदेशवहनासाठी ही कंपनी ज्या तंत्राचा वापर करते त्यानुसार रियल टाइम ट्रेसिंग शक्य नाही. केंद्र सरकारने दबाव आणल्यानंतर व्हॉटस्अ‍ॅपने त्यावर पर्याय शोधण्याचे आश्वासन दिले होते. वाढत्या फेकन्यूजला आळा घालण्यासाठी सरकारने काही मुद्दे सूचविले असून, त्यानुसार तक्रार अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: WhatsApp made appointment of Grievance Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.