मोदी सरकार काळ्या पैशांवर गप्प का ?, मायावतींचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 01:02 PM2018-07-01T13:02:34+5:302018-07-01T13:03:35+5:30

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

What is the Modi government's silence on black money, Mayawati questions Modi | मोदी सरकार काळ्या पैशांवर गप्प का ?, मायावतींचा मोदींना सवाल

मोदी सरकार काळ्या पैशांवर गप्प का ?, मायावतींचा मोदींना सवाल

Next

नवी दिल्ली- बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील जनतेला मोदी सरकारनं काळा पैशावर गप्प का आहे, हे जाणून घ्यायचं आहे. भाजपाही अशा लोकांवर कारवाई करत नाही. कारण स्विस बँकेत ज्यांचे पैसे आहेत त्या लोकांची भाजपाशी जवळीक आहे. त्यामुळे कमी कालावधीत भाजपा हा सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयास आला.

मोदींनी काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन दिलं होतं. विकासाच्या मुद्दा उपस्थित करून सत्तेवर आलेल्या भाजपानं नंतर स्वतःच्या मूळ विचारधारेनुसार जातीय द्वेषाचं राजकारण केलं. त्यामुळे त्यांनी जम्मू-काश्मीरमधल्या मेहबुबा मुफ्तींचा पाठिंबा काढून घेतला होता.

व्यावसायिक स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात आणि परदेशात पळून जातात. नरेंद्र मोदीसुद्धा अशा दिवाळखोर व्यावसायिकांना रोखण्यास असमर्थ ठरले आहेत, असंही मायावती म्हणाल्या आहेत.







 

Web Title: What is the Modi government's silence on black money, Mayawati questions Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.