भारताचे पहिले पंतप्रधान कोण? गुगल नाव सांगतो नेहरुंचं पण फोटो मोदींचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 09:40 AM2018-04-26T09:40:59+5:302018-04-26T09:40:59+5:30

सध्या गुगल एका प्रश्नाचं जे उत्तर देतो आहे, ते बघून सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरू झालं आहे.

What Jawaharlal Nehru looks like according to Google India | भारताचे पहिले पंतप्रधान कोण? गुगल नाव सांगतो नेहरुंचं पण फोटो मोदींचा

भारताचे पहिले पंतप्रधान कोण? गुगल नाव सांगतो नेहरुंचं पण फोटो मोदींचा

Next

नवी दिल्ली- गुगलवर प्रत्येक गोष्टींची एकदम अचूक माहिती मिळते, आवश्यक ती माहिती गुगल आपल्याला अगदी क्षणात देतो, असा आपल्या सगळ्यांचाच समज आहे. पण सध्या गुगल एका प्रश्नाचं जे उत्तर देतो आहे, ते बघून सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरू झालं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? (India first PM) असा सर्च तुम्ही गुगलवर दिल्यानंतर समोर येणारं उत्तर पाहून सगळ्यांना धक्का बसतो आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? असा सर्च दिल्यावर नाव जवाहरलाल नेहरुंचं नाव तर येतं आहे पण फोटो मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा येतो आहे. गुगलवर मिळणाऱ्या या उत्तराचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला जातो आहे. 

 गुगलच्या या चुकीने नेटीझन्सकडून स्क्रीनशऑट शेअर करून ट्रोल केलं जातं आहे.  नेटकऱ्यांनी गुगल इंडियाला याविषयीचे प्रश्नही विचारले आहेत. तर हा ‘गुगल एरर’ आहे असं म्हणत काहींनी थट्टाही केली.  दरम्यान गुगलकडून अद्यापही या प्रकरणी कोणतंच स्पष्टीकरण आलेलं नाही. पण, ही तांत्रिक चूक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. 

गुगलची ही चूक काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनीही ट्विट करत लक्षात आणून दिली आहे. @Google @GoogleIndia तुमचं कुठलं एल्गोरिदम याला परवानगी देतं. तुम्ही पूर्णपणे भंगार आहात, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


भारताच्या आत्तापर्यंतच्या पंतप्रधानांची यादी पाहण्यासाठी तुम्ही विकीपीडीया लिंकवर क्लिक केलं तर योग्य नावं व त्यांचे फोटो दिसत आहेत. पण तसं केलं नाही तर सर्चनंतर गुगलच्या होमपेजवर नेहरुंचं नाव व मोदींचा फोटो दिसतो आहे. 
 

Web Title: What Jawaharlal Nehru looks like according to Google India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.