दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानशी मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 11:27 AM2019-02-22T11:27:25+5:302019-02-22T11:29:55+5:30

भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे.

What does humanity mean in dealing with Pakistan -Nitin Gadkari? | दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानशी मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ- नितीन गडकरी

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानशी मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ- नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देपाकिस्तानचे वर्तन असेच राहिले. ते दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिले. त्यांच्यासोबत मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ आहेसध्या भारत केवळ आपल्या वाट्याचे पाणी रोखत आहे. मात्र  पाकिस्तानचा व्यवहार न सुधारल्यास त्यांना एक थेंबही देणार नाही

नवी दिल्ली - भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे. पाकिस्तानचे वर्तन असेच राहिले. ते दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिले. त्यांच्यासोबत मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच सध्या भारत केवळ आपल्या वाट्याचे पाणी रोखत आहे. मात्र  पाकिस्तानचा व्यवहार न सुधारल्यास त्यांना एक थेंबही देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  

पाकिस्तानचे पाणी रोखण्याच्या प्रश्नाबाबत गडकरी म्हणाले की, पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा निर्ण हा केवळ माझ्या खात्याचा नसेल. सरकार, पंतप्रधान यांच्या स्तरावर हा निर्णय होईल. पण मी माझ्या खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या खात्यांना पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी कुठे कुठे रोखता येईल, याबाबत तांत्रिक आराखडा बनवण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.'' 





दरम्यान,  पाकिस्तानची सार्वत्रिक कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास भारताने तयारी सुरू आहे. आता सिंधू जल करारातून माघार घेण्याच्या दिशेने भारताने पावले उचलली असून, त्यानुसार काश्मीर खोऱ्यातून पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी मोठी धरणे बांधून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. त्याचा फायदा जम्मू काश्मीर आणि पंजाबसह इतर राज्यांना होणार आहे, असे ट्विट नितीन गडकरी यांनी काल केले होते. 





पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धखोरीची धमकी दिलेली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तोंडचे पाणी पळविण्याचा थेट इशाराच देऊन टाकला होता. पुलवामा आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गडकरी यांनी केलेले महत्वाचे मानले जात होते. दरम्यान, आज अखेरीस यासंदर्भातील घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे.




 

Web Title: What does humanity mean in dealing with Pakistan -Nitin Gadkari?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.