काय करणार तलैवा? भाजपात जाणार की भाजपापासून दूर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:58 AM2018-06-02T04:58:17+5:302018-06-02T04:58:17+5:30

तामिळनाडू जनतेचा नवा ‘तलैैवा' (क्रांतिकारी नेता) सुपरस्टार रजनीकांतचा ‘काला' चित्रपट प्रदर्शित होत

What do you do? BJP to go away from BJP? | काय करणार तलैवा? भाजपात जाणार की भाजपापासून दूर?

काय करणार तलैवा? भाजपात जाणार की भाजपापासून दूर?

googlenewsNext

चेन्नई : तामिळनाडू जनतेचा नवा ‘तलैैवा' (क्रांतिकारी नेता) सुपरस्टार रजनीकांतचा ‘काला' चित्रपट प्रदर्शित होत आहे ७ जूनला. आध्यात्मिक राजकारण करू पाहाणारा रजनीकांत भाजपचाच समर्थक असल्याचे अनेकांना वाटत असले तरी त्याची ‘काला'तील भूमिका आहे गरिबांसाठी लढणाऱ्या, पण प्रसंगी मवालीगिरीही करणाºया माणसाची. त्याआधीच्या ‘कबाली' चित्रपटात त्याने साकारला होता आंबेडकरी अनुयायी.

या भूमिकांचा भाजपच्या राजकारणाशी कुठेच मेळ बसत नाही. त्यामुळे रजनीकांत ‘काला'च्या प्रदर्शनानंतर भाजपपासून दूर जाणार की आध्यात्मिक राजकारणाच्या स्वत:च्या भाषेला न्याय देण्यासाठी भाजपाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटात रजनीकांतने रंगविलेला काला गरिबांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. तो मवालीगिरीही करतो. ही भूमिका व रजनीकांतला करायचे असलेले आध्यात्मिक राजकारण यांच्यात प्रचंड अंतर आहे. त्यात चाहत्यांनी देवाचा दर्जा दिला आहे. त्याने द्राविडी बाज सोडून हिंदुत्वाचे राजकारण केले तर चाहते त्याला खाली आपटतील. त्यामुळेच कालाच्या प्रदर्शनानंतर रजनीकांतवर राजकीय भूमिका घेताना मोठे दडपण असणार आहे.

तो द्रमुक व अण्णा द्रमुकबरोबर जाऊ इच्छित नाही. तामिळनाडूमध्ये काँग्रेस संपल्यात जमा आहे. त्यामुळे तिथे जाण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. कमल हासन याचे राजकारण भाजपाविरोधी असेल, हे स्पष्टच झाले आहे. त्यामुळे द्रमुक-अण्णा द्रमुकविरोधी राजकारणासाठी रजनीकांत काय करणार, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Web Title: What do you do? BJP to go away from BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.