सीबीआयवर ममतांचीही वक्रदृष्टी; प. बंगालमध्येही प्रवेश बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 10:46 PM2018-11-16T22:46:34+5:302018-11-16T22:47:04+5:30

पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहीती दिली.

west Bengal also ban CBI | सीबीआयवर ममतांचीही वक्रदृष्टी; प. बंगालमध्येही प्रवेश बंदी

सीबीआयवर ममतांचीही वक्रदृष्टी; प. बंगालमध्येही प्रवेश बंदी

Next

कोलकाता : आंध्रप्रदेश सरकारने नुकतीच सीबीआयवर राज्यातील प्रवेशावर परवानगीशिवाय बंदी घातलेली असताना आता तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही नायडू यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. 


पश्चिम बंगाल सरकारने शुक्रवारी सीबीआयला चौकशी करण्यासाठी मिळत असलेल्या सामान्य मंजुरीवर बंदी आणली असून यापुढे सीबीआयला बंगालमध्ये छापे किंवा कोणाचीही चौकशी करता येणार नाही. 


पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहीती दिली. आंध्रप्रदेशमध्ये सीबीआयवर बंदी लादलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला होता. चंद्राबाबू यांनी ठीकच केले. भाजपा आपल्या राजकीय फायद्यासाठी सीबीआय सारख्या तपाससंस्थांचा वापर करून घेत आहे. यामुळे त्यांच्यावरील विश्वास उडत चालला असून लोकसभा निवडणुकीपूर्वी या संस्थेचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. 


पश्चिम बंगालमध्ये 1989 मध्ये वाम मोर्चा सरकारने सीबीआयला मंजुरी दिली होती. आज सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार यापुढे सीबीआयला न्यायालयीन आदेशांशिवाय अन्य प्रकरणांची चौकशी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. 
 

Web Title: west Bengal also ban CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.