वेल डन! निर्मला निर्मला सीतारमनजी,अरुण जेटलींकडून कौतुक   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 08:10 PM2019-01-04T20:10:53+5:302019-01-04T20:25:05+5:30

काँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहे

Well Done! Nirmala Nirmala Sitaramanji, praises by Arun Jaitley | वेल डन! निर्मला निर्मला सीतारमनजी,अरुण जेटलींकडून कौतुक   

वेल डन! निर्मला निर्मला सीतारमनजी,अरुण जेटलींकडून कौतुक   

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहेवेल डन! निर्मला सीतारमनजी, तुम्ही सरकारविरोधातील खोटा प्रचार संसदेत हाणून पाडलात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.", असे जेटलींनी ट्विटमध्ये म्हटले

नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून सध्या संसदेमध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये रणकंदन माजले आहे. दरम्यान, काँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहे. 

निर्मला सीतारमन यांचे  लोकसभेतील भाषण ऐकल्यानंतर अरुण जेटली यांनी ट्विटरवरून त्यांची प्रशंसा केली. वेल डन! निर्मला सीतारमनजी, तुम्ही सरकारविरोधातील खोटा प्रचार संसदेत हाणून पाडलात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.", असे जेटलींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  





दरम्यान, लोकसभेत राफेल संबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना निर्मला सीतारमन यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस सरकारला संरक्षण विभागाच्या गरजा कधीही समजल्या नाहीत. यासाठी त्यांनी आपल्या शेजारी देशांकडून धडा घ्यावा, असा सल्ला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल डीलवर भाष्य करताना दिला. आम्ही संरक्षणासाठी डील करतो. ते संरक्षणाचं डील करतात, अशी खरमरीत टीका सीतारामन यांनी काँग्रेसवर केली. राफेल डीलसाठी 8 वर्षे का लागली आणि यानंतरही एकही राफेल विमान भारतात का आणता आलं नाही?, असे प्रश्न संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसला विचारले. 

संसदेत गेल्या काही दिवसांपासून संसदेत राफेल डीलचा मुद्दा गाजतो आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हा मुद्दा सतत लावून धरला आहे. परवा राहुल गांधींनी राफेल डीलवरुन थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. राफेल डीलबद्दल मोदींनी 20 मिनिटं चर्चा करावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या आरोपांना आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं. मी आणि सरकार राफेल डीलसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. मात्र आमच्या उत्तरांची काँग्रेसला भीती वाटते, असा टोला त्यांनी लगावला. 

Web Title: Well Done! Nirmala Nirmala Sitaramanji, praises by Arun Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.