Pulwama Attack: सीआरपीएफचा 'हाय जोश'; घृणास्पद हल्ल्याचा बदला घेऊ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 02:00 PM2019-02-15T14:00:57+5:302019-02-15T14:07:22+5:30

हल्ला विसरणार नाही, हल्लेखोरांना माफ करणार नाही; सीआरपीएफची प्रतिज्ञा

We Will Not Forget We Will Not Forgive heinous attack will be avenged Crpf On Pulwama Attack | Pulwama Attack: सीआरपीएफचा 'हाय जोश'; घृणास्पद हल्ल्याचा बदला घेऊ! 

Pulwama Attack: सीआरपीएफचा 'हाय जोश'; घृणास्पद हल्ल्याचा बदला घेऊ! 

Next

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीपाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला आहे. यानंतर आता सीआरपीएफनं मोजक्याच मात्र तीव्र शब्दांमध्ये या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि हल्लेखोरांना कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांमध्ये सीआरपीएफनं हल्लेखोरांना सूचक इशारा दिला आहे. सीआरपीएफनं ट्विट करुन हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरात काल दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. या हौतात्म्यानंतर सीआरपीएफनं दिलेली प्रतिक्रिया अतिशय सूचक आणि महत्त्वपूर्ण आहे. 

दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं. सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर पंतप्रधानांनी तीव्र शब्दांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला. दहशतवाद्यांनी खूप मोठी घोडचूक केली आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, अशा शब्दांमध्ये मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं.

मोदींच्या कठोर प्रतिक्रियेनंतर आता सीआरपीएफनं शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत एक ट्विट केलं आहे. 'आम्ही विसरणार नाही, आम्ही माफही करणार नाही', असं या ट्विटमध्ये सीआरपीएफनं म्हटलं आहे. 'पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आम्ही वंदन करतो. आम्ही आमच्या शहीद भावंडांच्या कुटुंबांसोबत आहोत. या भ्याड हल्ल्याचा बदला घेऊ,' असं ट्विट त्यांनी केलं आहे. दहशतवाद्यांना थेट आणि स्पष्ट इशारा देणारं सीआरपीएफचं हे ट्विट महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. 




काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार झाले. 

Web Title: We Will Not Forget We Will Not Forgive heinous attack will be avenged Crpf On Pulwama Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.