'आम्हाला न्याय मिळाला नाही', निर्भयाच्या आई-वडिलांचा मतदानावर बहिष्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 05:44 PM2019-04-26T17:44:14+5:302019-04-26T17:45:02+5:30

आम्ही थकलो आहोत, प्रत्येक पक्ष आम्हाला न्याय मिळवून देण्याचे वचन देतो.

'We have not got justice', boycott of fearless parents voting in delhi lok sabha election, nirbhaya gangrape case | 'आम्हाला न्याय मिळाला नाही', निर्भयाच्या आई-वडिलांचा मतदानावर बहिष्कार 

'आम्हाला न्याय मिळाला नाही', निर्भयाच्या आई-वडिलांचा मतदानावर बहिष्कार 

Next

नवी दिल्ली - दिल्लीतील निर्भया हत्याकांडाला जवळपास 7 वर्षे उलटून गेली. पण, अद्यापही आम्हाला न्याय मिळाला नाही, अजूनही आरोपींना शिक्षा झाली नाही. त्यामुळे आम्ही यंदा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे निर्भयाच्या माता-पितांनी म्हटले आहे. आशा देवी आणि बद्रिनाथसिंह यांनी, आरोपींना कधी शिक्षा होणार ? असा प्रश्न विचारला आहे. राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चालू बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्या तरुणीची पीडित आई आशावादी भावनेतून बोलत होती.  

आम्ही थकलो आहोत, प्रत्येक पक्ष आम्हाला न्याय मिळवून देण्याचे वचन देतो. आमच्या मुलीला न्याय मिळेल, असे सांगतात. पण, त्यांची सहानुभूती, त्यांची वचने आणि त्यांची आश्वसने सर्वच खोटं आहे. केवळ मतांसाठी हे भावनिक राजकारण आहे. देशातील रस्त्यावर आजही एखादी मुलगी किंवा स्त्री बिनधास्तपणे चालू-फिरू शकत नाही. स्त्रिया आणि लहान मुले आजही राक्षसी वृत्तीचे शिकार होत आहेत, असे निर्भयाची आई आशा देवी यांनी म्हटले आहे. 

लोकांना आता सिस्टीमवर विश्वासच राहिला नाही. सर्वच पक्षांच्या सरकारांनी सिस्टीमला फेल केले आहे. त्यामुळेच यंदा मी कुठल्याही पक्षाला मतदान करणार नसल्याचे आशा देवी यांनी म्हटले आहे. तसेच, आशा देवी यांचे पती आणि दिवंगत निर्भयाचे वडिल ब्रदीनाथ सिंह यांनीही मतदान करणार नसल्याचे म्हटले आहे. सर्वच पक्ष महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेविषयी बोलतात. मात्र, कुठल्याही पक्षाकडे  यासाठी कोणतीही योजना नाही. शेवटी आमच्याकडे, कष्ट, संघर्ष, एकट्याची लढाई आणि हतबलता याशिवाय काहीही नाही. निवडणुकांवेळी केवळ पोकळ आश्वासने आम्हाला मिळतात. आपल्या स्वार्थासाठी लोकांन वेड्यात काढण्याचे काम या राजकीय पक्षांकडून केले जात असल्याचे बद्रिनाथ सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, देशात लोकसभा निवडणुका रंगात आल्या असून पहिल्या तीन टप्प्यात मतदान पार पडले आहे. दिल्लीत 12 मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. 
 

Web Title: 'We have not got justice', boycott of fearless parents voting in delhi lok sabha election, nirbhaya gangrape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.